Full Width(True/False)

WhatsApp, Twitter, Youtube, Facebook पाकिस्तानात सोशल मीडिया अॅप्सवर बंदी

नवी दिल्लीः पाकिस्तानात ट्विटर, फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअॅप, टिकटॉक आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. या सोशल मीडिया अॅप्सवर सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारी पाकिस्तानचे गृह मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. वाचाः पाकिस्तानच्या मंत्रालयाने म्हटले की, टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी (PTA) ने दिशा निर्देश देताना या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानचे गृह मंत्रालयाने PTA ला दिशा निर्देश देताना या अॅप्सला ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. वाचाः मिळालेल्या माहितीनुसार, एक पार्टी द्वारा हिंसाचार झाल्यानंतर कायदा सुव्यवस्था सुरक्षित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानात सध्या विरोध आंदोलन रोखण्यात पाकिस्तान सरकारला अपयश आले आहे. सरकारने आता लोकांच्या अभिव्यक्ती स्वातत्र्यांवर बंदी घालणे सुरू केले आहे. पाकिस्तानात अनेक असे व्हिडिओ आहेत जे आता व्हायरल झाले आहेत. ज्यात पाकिस्तान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांसमोर गुडघे टेकले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tphusd