नवी दिल्लीः ने मंगळवारी म्हटले की, त्यांनी आंध्र प्रदेश, दिल्ली आणि मुंबई सर्कलमध्ये ८०० मेगाहर्ट्ज बँडमध्ये काही स्पेक्ट्रम खरेदीसाठी भारती एअरटेल सोबत करार केला आहे. हा करार जवळपास १४९७ कोटी रुपयांचा आहे. वाचाः रिलायन्स जिओ ८०० मेगाहर्ट्ज बँड मध्ये आंध्र प्रदेश, दिल्ली आणि मुंबई मध्ये अतिरिक्त स्पेक्ट्रमचा उपयोग करून आपल्या ग्राहकांना आणखी चांगली सुविधा देऊ शकते. या तीन सर्कलमध्ये रिलायन्स जिओकडे एकूण ७.५ मेगाहर्ट्ज अतिरिक्त स्पेक्ट्रम उपलब्ध होणार आहे. जिओच्या माहितीनुसार, हा करार दूरसंचार विभागाकडून जारी स्पेक्ट्रम व्यापाराच्या दिशानिर्देशांनुसार करण्यात आला आहे. वाचाः एअरटेलने सुद्धा वेगळ्या पद्धतीने या कराराला दुजोरा दिला आहे. कंपनीला अतिरिक्त स्पेक्ट्रम देण्यासाठी जिओ १,०३७.६ कोटी रुपये देणार आहे. याशिवाय, जिओ स्पेक्ट्रमवरून ४५९ कोटी रुपये नंतर देणार आहे. जो करार संबंधित पार्टनरशीपवर अवलंबून आहे. कंपनीच्या माहितीनुसार, करारासाठी जिओला एअरटेलचे ८०० मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम मध्ये उपयोग म्हणून आंध्र प्रदेशमध्ये ३.७५ मेगाहर्ट्ज, दिल्लीत १.२५ मेगाहर्ट्ज आणि मुंबईत २.५० मेगाहर्ट्ज, हस्तांतरीत केले जाणार आहे. जिओच्या माहितीनुसार, नवीन स्पेक्ट्रम मुळे रिलायन्स जिओची नेटवर्क क्षमता आणखी मजबूत होणार आहे. वाचाः बयान में कहा गया है कि स्पेक्ट्रम के उपयोग के लिए हुए समझौते के बाद रिलायंस जियो के पास मुंबई सर्किल के 800 मेगाहर्ट्ज बैंड में 2X15 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम तथा आंध्र प्रदेश और दिल्ली सर्किल में 800 मेगाहर्ट्ज बैंड में 2X10 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम उपलब्ध होंगे. इससे इन सर्किलों में ग्राहक सेवाओं को और मजबूत किया जा सकेगा. वाचाः जिओने नुकतेच खरेदी केले ५७,१०० कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने मार्चच्या सुरूवातीला स्पेक्ट्रमच्या विक्रीत सर्वात जास्त बोली लावली होती. कंपनीने ८०० मेगाहर्ट्ज, १८०० मेगाहर्ट्ज आणि २३०० मेगाहर्ट्ज बँड मध्ये ५७,१०० कोटी रुपयांत ४८८.३५ मेगाहर्ट्जचे स्पेक्ट्रम खरेदी केले आहे. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PFkqSR