Full Width(True/False)

शाहरुखला मुंबईतून हाकलण्याची मागणी, काय होती प्रतिक्रिया

मुंबई: अभिनेता शाहरुख खाननं आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यानं आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण हे सर्व त्याच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. अनेकदा त्याला प्रेक्षकांची टीका सहन करावी लागली. एवढंच नाही तर त्याला मुंबईतून हाकलून लावण्याची मागणी सुद्धा करण्यात आली होती. २०१८ मध्ये फिल्मफेअर मासिकाला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखनं हा किस्सा शेअर केला. 'फिल्मफेअर' मासिकाच्या मुलाखतीत शाहरुखला, 'स्वतःबद्दल ऐकलेली सर्वात वाईट बाब कोणती?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर शाहरुख म्हणाला, 'ऑथर अशोक बँकरने एकदा माझ्याबद्दल लिहिलं होतं की, मला मुंबईतून हाकलून लावायला हवं कारण आम्ही अभिनेते इथे राहणाऱ्या लोकांसाठी धोकादायक आहोत. आमचं काम आणि कथित अंडरवर्ल्ड डिलिंगमुळे लोक आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात निर्दोष प्रेक्षकांचाही बळी जातो.' शाहरुख पुढे म्हणाला, 'कोणी मला दुःखी केलं ही माझ्यासाठी वाईट गोष्ट नव्हती. पण त्यांच्या पूर्ण वक्तव्याचं मला फार वाईट वाटलं. कोणी कोणाला असं नाही सांगू शकत की, त्या व्यक्तीनं कुठे राहावं किंवा राहू नये. कोणीही मला मुंबई सोडण्यासाठी सांगू शकत नाही. खासकरून तेव्हा जेव्हा मी माझ्या घरासाठी एवढा खर्च केला आहे. ' शाहरुखा खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तो आनंद एल राय यांच्या 'झीरो' चित्रपटात शेवटचा दिसला होता. ज्यात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर असलेला शाहरुख लवकरच 'पठाण' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोणचीही मुख्य भूमिका आहे. तर अभिनेता जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dm2S7s