मुंबई- जेव्हाही हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेमकथांबद्दल बोललं जाईल तेव्हा आणि यांचं नाव सगळ्यात पहिल्यांदा घेतलं जाईल. त्यांनी 'मिस्टर नटवरलाल', 'सिलसिला', 'दो अनजाने', 'नमक हराम', 'मुकद्दर का सिकंदर' यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केलं. तेव्हा असं क्वचितच एखादं मासिक किंवा वृत्तपत्र असेल ज्यात या दोघांच्या प्रेमकहाणीबद्दल छापून येत नसेल. त्यांच्यातील नातं दोघांनी कधीही मान्य केलं नाही. त्यांच्यातील प्रेमाची सुरुवात अमिताभ आणि यांच्या विवाहानंतर झाली. १९७३ साली लग्न झाल्यानंतर त्यांच्या अफेअरबद्दल वृत्तपत्रांमध्ये छापून येऊ लागलं. त्यावर उपाय म्हणून जया यांनी एक मोठं पाउल उचललं होतं. जया त्यांच्या अफेअरबद्दल वाचून खूप चिंतेत असत. त्यांना त्यांचा संसार वाचवायचा होता. त्यांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवला. एके रात्री त्यांनी असं काही केलं ज्यामुळे रेखा अमिताभ यांच्या आयुष्यातून कायमच्या दूर झाल्या. एके दिवशी अमिताभ चित्रीकरणासाठी मुंबईच्या बाहेर होते. तेव्हा जया यांनी रेखांना फोन केला. रेखा यांनी जया यांचा फोन उचलत विचार केला की, आता या काहीतरी वाईट बोलतील. परंतु, प्रत्यक्षात असं काहीही झालं नाही. उलट जया यांनी रेखा यांना रात्रीच्या जेवणाचं निमंत्रण दिलं. त्या रात्री त्या दोघींनी खूप गप्पा मारल्या. त्या गप्पांमध्ये अमिताभ यांचा उल्लेख कुठेही नव्हता. जेव्हा रेखा जायला निघाल्या तेव्हा जया त्यांना सोडण्यासाठी दरवाज्यावर आल्या. तेव्हा त्या जे म्हणाल्या ते ऐकून रेखा पूर्णपणे हादरून गेल्या. जया त्यांना म्हणाल्या, 'काहीही झालं तरी चालेल, पण मी अमितला सोडणार नाही.' दुसऱ्या दिवशी वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये त्यांच्या रात्रीच्या जेवणाबद्दल बऱ्याच गोष्टी छापून आल्या. परंतु, ना जया यांनी काही सांगितलं, ना रेखा काही बोलल्या. त्यानंतर रेखा यांनी अमिताभ यांच्यासोबत कधीही काम केलं नाही. 'सिलसिला' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. आजही ते दोघे कधी एकमेकांसमोर आले तर नजरेला नजर न मिळवता निघून जातात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fXFizh