मुंबई : स्टार प्लसवरून प्रसारित होणारी '' मालिका प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय असल्याने या मालिकेचा टीआरपी सर्वात जास्त आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपा गांगुली आणि अभिनेता सुंधांशु पांडे यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. तर दुसरीकडे या मालिकेबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची लोकांना प्रचंड उत्सुकता आहे. आज आपण या मालिकेत काम करणा-या कलाकारांना किती मानधन मिळते हे जाणून घेणार आहोत. इतके मानधन घेतात कलाकार या मालिकेमध्ये रुपा गांगुली, सुधांशु पांडे, मदालसा शर्मा, अरविंद वैद्य, पारस कलनावत, आशिष मेहरोत्रा, मुस्कान बामनी, शेखर खुल्का, निधि शाह आणि तस्मीन नेरुरकर हे मुख्य कलाकार आहेत. या सर्व कलाकारांचे जसे फॅन फॉलोईंग जसे तगडे आहे तसेच या कलाकारांचे मानधनही तसेच तगडे आहे...यातील काही निवड कलाकारांचे मानधन किती आहे हे जाणून घेऊ या. तस्मीन नेरुरकर या मालिकेत राखी दवे ही भूमिका साकारत आहे. राखी दवे किंजलची आई आणि अनुपमा वनराजची विहिण आहे. या भूमिकाला विविध कंगोरे आहेत. तस्मीनला ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी एका भागासाठी २६ हजार रुपये दिले जातात. मुस्कान बामनी या मालिकेत पाँखी ही भूमिका साकारत आहे. प्रत्येक भागासाठी मुस्कानला २७ हजार रुपये दिले जातात. मदालसा शर्मा या मालिकेमध्ये खलनायिका व्यक्तिरेखा साकारत आहे. काव्या असे तिच्या भूमिकेचे नाव आहे. या मालिकेत काम करण्यासाठी मदालसा हिला एका भागासाठी ३० हजार रुपये दिले जातात. या मालिकेत अनुपमा आणि वनराज यांच्या लहान मुलाची समर वनराजची भूमिका साकारणाऱ्या पारस कलानवत याला एका भागासाठी ३५ हजार रुपये दिले जातात. सुधांश पांडे हा या मालिकेतील प्रमुख भूमिका वनराज शाह ही भूमिका साकारत असून त्याला एका भागासाठी ५० हजार रुपये दिले जातात. तर या मालिकेतील प्रमुख भूमिका म्हणजे अनुपमा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री रुपा गांगुली हिला एका भागाचे ६० हजार रुपये दिले जातात. रुपा गांगुलीला सर्वाधिक मानधन अनुपमा मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री रुपा गांगुली हिला सर्वाधिक मानधन मिळते. त्यामुळे छोट्या पडद्यावरील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून रुपा गांगुली हिचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. दरम्यान, रुपा गांगुली हिला करोनाची लागण झाली आहे. सध्या ती होम क्वारंटाईन आहे. अलिकडेच या अभिनेत्रीने तिचा ४४ वा वाढदिवस साजरा केला होता. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट केले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cZwKWW