Full Width(True/False)

रणवीरला म्हटलं कंगनाचं मेल व्हर्जन, अभिनेत्यानं दिलं उत्तर

मुंबई: बॉलिवूड अभिनेता बॉलिवूडच्या अशा कलाकारांपैकी आहे. जे सातत्यानं सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि वेगवेगळ्या मुद्द्यावर आपलं मत सोशल मीडियावर मांडताना दिसतात. पण त्याच्या नुकत्याच केलेल्या एका ट्वीटवरून एका युझरनं रणवीरची तुलना कंगना रणौतशी करत त्याला कंगनाचं मेल व्हर्जन असं म्हटलं होतं. ज्यावर या युझरला मजेशीर उत्तर देत रणवीरनं त्याची बोलती बंद केली आहे. नुकतंच रणवीर शौरीन राहुल गांधींच्या संदर्भात एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमधून त्यानं राहुल गांधींचं कौतुक केलं होतं. त्यानं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'करोनाचं वाढतं संक्रमण पाहता राहुल गांधी यांनी आपल्या निवडणूक रॅली रद्द केल्या आहेत.' रणवीर शौरीच्या या ट्वीटवर कमेंट करताना एका युझरनं लिहिलं, 'तू काहीच नाहीस, फक्त कंगना रणौतचं मेल व्हर्जन आहेस. मूर्ख' युझरच्या या कमेंटवर रणवीर शौरीनंसुद्धा मजेदार अंदाजात उत्तर देत त्याची बोलती बंद केली आहे. या ट्रोलर करणाऱ्या युझरला उत्तर देताना अक्षय कुमारचा एक मजेदार GIF शेअर केला आहे. ज्यात अक्षय, 'तेरी जली ना?' असं म्हणताना दिसत आहे. रणवीर शौरीच्या या अंदाजाचं त्याचे चाहते खूप कौतुक करताना दिसत आहेत. रणवीर शौरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तो सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्यासोबत टायगर सीरिजमध्ये दिसणार आहे. रणवीर शौरीसोबत 'टायगर ३'मध्ये इम्रान हाश्मीचीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. इम्रान आणि सलमान यांचा एकत्र पहिलाच चित्रपट आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RSzygs