Full Width(True/False)

सुश्मितासाठी पत्नीचा विश्वासघात केल्याचा पश्चाताप- विक्रम भट्ट

मुंबई: बॉलिवूडमध्ये अफेअर आणि ब्रेकअप हे काही नवीनं नाही. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींच्या लव्हस्टोरीचे किस्से नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. असाच एक किस्सा होता अभिनेत्री आणि दिग्दर्शक यांच्या अफेअरचा. जेव्हा या दोघांचं अफेअर असल्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या त्यावेळी त्यावर विश्वास ठेवणं सर्वांनाच कठीण झालं होतं. पण जेव्हा हे दोघं वेगळे झाले तेव्हा विक्रम भट्ट यांनी यावर पश्चाताप होत असल्याचं म्हटलं होतं. सुश्मिता सेननं नेहमीच आपलं खासगी आयुष्य खुल्या पुस्तकाप्रमाणेच सर्वांसमोर मांडलं आहे. विक्रम आणि सुश्मिताच्या अफेअरच्या चर्चांना १९९६ मध्ये सुरुवात झाली होती. 'दस्तक' चित्रपटाच्या सेटवर या सगळ्याची सुरुवात झाली. त्यावेळी महेश भट्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन करत होते. सुश्मिता सेन या चित्रपटाची नायिका होती तर विक्रम भट्ट यांनी या चित्रपटाचा स्क्रिनप्ले लिहिला होता. सुश्मिता आणि विक्रम यांचं अफेअर सुरू झालं त्यावेळी विक्रम भट्ट एका मुलीचे पिता होते. या अफेअरमुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ निर्माण झालं होतं. एवढंच नाही तर सुश्मितासाठी विक्रम भट्ट आपली पत्नी आणि मुलीला सुद्धा सोडयला तयार झाले होते. विक्रम म्हणाले, 'मी एका अशा नात्यासाठी माझ्या पत्नीचा विश्वासघात केला याचा मला पश्चाताप होतो. माझं मत आहे की, जेव्हा तुमच्याकडे तेवढी हिंमत असते तेव्हा तुम्ही चालक होता. जेव्हा हे सर्व माझ्यासोबत घडत होतं त्यावेळी मी अदितीला सर्वकाही समजावून सांगू मला काय जाणवतंय हे सांगू एवढी हिंमत नव्हती. हे सर्व एकाच वेळी घडत होतं आणि सर्वच गडबड झाली. मी त्यावेळी कमजोर झालो होतो. याचं मला आजही दुःख आहे. त्यावेळी मी हिंमत दाखवली असती तर कगाचित आज गोष्टी वेगळ्या असत्या. मी माझ्या मुलीला आणि पत्नीला खूप दुःख दिलं.' विक्रम पुढे म्हणाले, 'मी माझ्या पत्नीला घटस्फोट दिला. माझा चित्रपट 'गुलाम' त्यावेळी रिलीज होणार होता. पण मी फक्त त्यावेळी सुश्मिताचा बॉयफ्रेंड म्हणूनच चर्चेत राहिलो. मी डिप्रेशनमध्ये गेलो. आत्महत्येचा प्रयत्न केला पण हे सर्व सुश्मितामुळे घडलं नव्हतं तर मी माझ्या आयुष्यात केलेल्या चुकांमुळे घडलं होतं. मी माझं आयुष्य स्वतः खराब केलं होतं. त्यानंतर मला माझ्या मुलीची खूप आठवण यायची. कोणत्याही नात्यानं मला संपवलं नाही तर या सर्व गोष्टींना सर्वस्वी मीच जबाबदार होतो.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PbSKF0