Full Width(True/False)

तुम्हाला व्हॅक्सिन कसे दिले? अनिल कपूरांच्या फोटोवर प्रश्न

मुंबई- देशात एकीकडे करोनाचा झपाट्याने प्रसार होत असल्याने पेशंटची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. तर दुसरीकडे नागरिकांना व्हॅक्सिन देण्याचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. करोना व्हॅक्सिनच्या पुढच्या टप्प्यावर १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. सध्या ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांना व्हॅक्सिन दिले जात आहे. या टप्प्यामध्ये अनेक कलाकरांनीही करोना व्हॅक्सिन घेत त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत लोकांनाही व्हॅक्सिन घेण्याचे आवाहन केले आहे. ६४ वर्षांचे अभिनेते यांनीही करोना व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतल्यानंतर आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो पोस्ट केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी भन्नाट कमेन्ट केल्या आहेत. अनिल कपूर यांनी करोना व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेत त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो पोस्ट करताना त्यांनी लिहिले, 'व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला. सर्वांनी घरी रहा, सुरक्षित रहा.' या फोटोमध्ये अनिल कपूर यांनी काळ्या रंगाचा टीशर्ट घातला आहे. अनिल यांच्या चाहत्यांनीच नाही तर अनेक सेलिब्रिटींनीही या फोटोवर कमेन्ट केल्या आहेत. अगदी अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन आणि मुलगी रिया कपूरनेही कमेन्ट केल्या आहेत. सर्वात मेजशीर कमेन्ट तर अभिनेता रोहित रॉयने दिली आहे, तो म्हणतो, '१८ वर्षांच्या वर असलेल्या लोकांना १ मे पासून व्हॅक्सिन देण्यात येणार आहे. या लोकांनी तुम्हांला आधीच कशी काय दिली?' अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धनने लिहिले, '४५ वर्षांपेक्षा लहान असलेल्या लोकांना व्हॅक्सिन १ मे नंतर दिली जाणार आहे, हे त्यांना माहीत नव्हते का?' अशाच आशयाच्या अनेक कमेन्ट नेटकऱ्यांनी फोटोवर दिल्या आहेत. या सगळ्या कमेन्टला उत्तर देताना अनिल कपूर म्हणाले, 'व्हॅक्सिन देण्याआधी या लोकांनी जर माझ्या आधारकार्डावरची जन्मतारीख पाहिली नसती तर त्यांनी मला १ मे नंतरच बोलावले असते.' अभिनेते अनिल कपूर हे त्यांच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहेत. वयाच्या ६४व्या वर्षीही त्यांचा फिटनेस एखाद्या तरुणालाही लाजवेल असा आहे. त्यांच्या फिटनेसचं सातत्याने चाहते कौतुक करत असतात. अनिल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या कायम संपर्कात असतात. ते आपले वर्कआउटचे व्हिडिओही चाहत्यांसोबत शेअर करत असतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QcBkss