मुंबई: बॉलिवूडमधील संवेदनशील कलाकारांमध्ये याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तोच कलाकार यशस्वी होतो, ज्याच्याकडे स्वतःची अशी वेगळी स्टाइल असते. नवीन येणारे तथाकथित सुपरस्टारनी जर कुणाला कॉपी केले तर प्रेक्षक त्यांना कधीच स्वीकारणार नाहीत. सुपरस्टार खोटा अभिनय करतात आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारा नवाजुद्दीन मुलाखतीमध्ये म्हणाला, 'माझ्या अनुभवावरून इतकेच सांगतो की, अभिनय करताना तुम्ही तुमची स्टाइल सोडू नये. आताचे जे कुणी सुपरस्टार आहेत ते सगळेजण खोटा अभिनय करतात, खरे तर त्यांनी स्वतःची अशी स्टाइल निर्माण केली पाहिजे. अभिनय करताना जे मला जमतं तेच मी करतो. मी पण जर एखाद्या सुपरस्टारप्रमाणे अभिनय करायला लागलो तर मला प्रेक्षक का बघतील?' स्वार्थासाठी ओटीटीवर आले सुपरस्टार सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक सुपरस्टार दिसत आहेत, त्याबद्दल नवाज म्हणाला, 'सध्या हे सर्व सुपरस्टार ओटीटीवर येत आहेत, कारण करोनामुळे सिनेमागृहात सिनेमे प्रदर्शित होत नाहीत. सुरुवातीला चांगले काम आणि कामाबद्दलचे प्रेम यामुळे अनेकजण ओटीटीकडे आले होते. परंतु करोनामुळे झालेल्या लॉकडाउनमुळे सिनेमांचे रिलीज थांबले. त्यामुळे हे सर्वजण ओटीटीवर आले आहेत. ही चांगली गोष्ट नाही. आता हे मोठमोठे सुपरस्टार ओटीटीवर येऊन काम करत आहेत, हे सर्वजण याआधी येथे का नाही आलेत? ' हे करताना भीती वाटली होती अलिकडेच नवाजुद्दीने एका म्युझिकल व्हिडीओमध्ये पदार्पण केले आहे. बी. प्राकने 'बारिश की जाए' हे गाणे गायले असून लोकांनी या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओत काम करण्याच्या अनुभवाबद्दल नवाजुद्दीने सांगितले,' याआधी कधीच अशा प्रकारच्या म्युझिकल व्हिडीओमध्ये काम केले नसल्याने हा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. या व्हिडीओसाठी दोन दिवस चित्रीकरण केले. सुरुवातील चित्रीकरणावेळी मला खूप भिती वाटली होती. कारण याआधी मी कधीच डान्स केला नव्हता. परंतु सराव केल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि नंतर सर्वकाही ठीक झाले...'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mIl6mG