नवी दिल्लीः : हँडसेट निर्माता कंपनी रियलमी आपला नवीन स्मार्टफोन रियलमी 8 5G Smartphone ला लाँच करण्याची तयारी करीत आहे. याची माहिती कंपनीने नुकतीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. आगामी Realme Mobile फोन गेल्या महिन्यात भारतात लाँच झालेल्या रियलमी ८ चे अपग्रेड व्हर्जन असणार आहे. टीज करण्यात आलेल्या रियलमी ८ ५जी स्मार्टफोन ग्रेडिएंट बॅक फिनिश सोबत येणार आहे. वाचाः रियलमी ८ ५जी ला काही वेळेआधी अनेक सर्टिफिकेशन साइट्स वर पाहिले गेले आहे. फोनला भारतासह अन्य मार्केटमध्ये लाँच केले जाऊ शकते. रियलमीची अधिकृत थायलँड फेसबुक पेजवरून ची लाँच तारीखची माहिती दिली आहे. टीजर व्हिडिओत फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आले आहे. ज्यात आगामी रियलमी स्मार्टफोनची झलक पाहायला मिळत आहे. वाचाः व्हिडिओत रियलमी ८ ५जी चे बॅक पॅनेल ग्रेडिएंट फिनिश सोबत ब्लॅक शेड मध्ये दिसत आहे. परंतु, बॅक पॅनेलवर Dare to Leap ब्रँडिंग नाही. जी रियलमी ८ च्या बॅकला पाहिली गेली होती. काही लिक्ड इमेजने हे संकेत स्पष्ट दिले होते की, Realme 8 5G च्या बॅक पॅनेलवर टॅगलाइन असणार आहे. वाचाः कॅमेरा सेटअप मध्ये रियलमी स्मार्टफोनला ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सोबत बाजारात उतरवले जाऊ शकते. रियलमी ८ स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला होता. २१ एप्रिल ला फोन थायलँड मध्ये लाँच होणार आहे. परंतु, कंपनी भारतात रियलमी ८ ५जी च्या लाँचिंगची टीजर करीत आहे. आता हे स्पष्ट नाही की, भारतात या फोनला थायलँडमध्ये लाँचच्या आधी उतरवले जाणार की नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3a46SHH