नागपूरमधील विचारवंत, लेखक, अभिनेते यांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. आठ दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. दरम्यान गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘’ सिनेमातील त्यांची भूमिका गाजली होती. भारताकडून ऑस्करसाठीही या सिनेमाला नामांकित करण्यात आले होते. सर्वश्रेष्ठ परदेशी भाषेतील सिनेमा यासाठी कोर्टला नामांकन देण्यात आलं होतं. वर्धा जिल्ह्यातील जोगीनगर येथे वीरा लहानाचे मोठे झाले. गरिब कुटुंबात जन्माला आलेल्या वीरा यांना शिकण्याची ताकद त्यांच्या आईनेच दिली. वीरा यांचे वडील नागपुर येथील रेल्वे स्थानकावर हमालीचे काम करायचे तर आई बांधकाम मजूर म्हणून राबायची. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वीरा साथीदार यांच्यावर पगडा होता. त्यांनी पत्रकार म्हणूनही अनेक वर्ष काम केलं. ते स्वत: गीतकारही होते. आंबेडकर चळवळीतील अनेक गाणीही त्यांनी गायली आहेत. ‘विद्रोही’ नावाच्या मासिकाचे संपादन केले. ‘रिपब्लिकन पँथर’ संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते. त्यांची व्याख्यानं विशेष गाजली होती. पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष केला होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mJduQw