मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आणि अभिनेत्री लवकरच चित्रपट '' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खरं तर हा चित्रपट २०२०च्या ख्रिसमसलाच रिलीज होणार होता मात्र करोना व्हायरसच्या संक्रमणामुळे या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होऊ शकलं नाही आणि चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता या चित्रपटाच्या शूटिंगबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर खाननं गप्पा मारल्या. आमिर खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आगामी चित्रपट लाल सिंह चढ्ढाबद्दलचे अपडेट शेअर केले. या मुलाखतीत आमिर म्हणाला, एकिकडे संपूर्ण जग करोना व्हायरसशी लढत होतं आणि आम्ही सर्व करोनासोबतच प्रेग्नन्ट करिनाशी लढत होतो. आमिर खानचा हा चित्रपट हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गम्प' या चित्रपटावर आधारित आहे. याच चित्रपटाचं उदाहरण देत आमिर आपलं म्हणणं मांडलं. आमिर खान म्हणाला, जर तुम्ही फॉरेस्ट गम्प पाहिला असेल तर तुम्हाला माहीत असेल की या चित्रपटाची सुरुवात एका पंखापासून होते. हा पंख हवेतून उडत उडत खाली जमिनीवर येतो आणि मग लोकांच्या खांद्यांवर हळूहळू स्थिरावत जातो. त्यानंतर हवेच्या झोताप्रमाणे हा पंख इथून तिथे उडत राहतो. त्यामुळे मी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक यावरून नेहमीच मस्करी करायचो की, जेव्हापासून आम्ही हा चित्रपट तयार करायचं ठरवलं आहे तेव्हापासून आमचं आयुष्य सुद्धा त्या पंखाप्रमाणे झालं आहे. आमिर पुढे म्हणाला, आम्ही विचार करत होतो की, आम्ही कुठे जाऊन उतरणार आहोत. कारण एकिकडे संपूर्ण जग करोना व्हायरसचा सामना करत असताना आम्हाला मात्र करोनासोबत चित्रपटाची अभिनेत्री करिनाचाही सामना करावा लागत होता. चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना समजलं की ती प्रेग्नन्ट आहे. आणखी एक समस्या हवेचा आणखी झोत आला आणि आम्ही दुसऱ्या बाजूला ढकलले गेलो. त्यामुळे आता आम्ही पुन्हा एकदा कुठे लँड करायचं याचा विचार करत आहोत. सध्या तरी सर्व गोष्टी ठीक आणि कंट्रोलमध्ये आहेत. आशा करतो की, हा चित्रपट या वर्षाच्या शेवटीपर्यंत तरी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3s8USe9