मुंबई: भारतात सध्या करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस करोना व्हायरसचं संक्रमण झालेल्या लोकांची संख्या वाढताना दिसत आहे. अशात हरिद्वार येथे कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यात सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळले जात नाहीयेत. यावर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक यांनी नाराजी व्यक्त करत कठोर शब्दात टीका केली आहे. राम गोपाल वर्मा नेहमीच कोणत्याही मुद्द्यावर बेधडक शब्दात टीका करण्यासाठी ओळखले जातात. नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमध्ये कुंभ मेळ्याचा एक फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, 'तुम्ही जो पाहात आहात तो नाही तर एक अॅटम बॉम्ब आहे. मला उत्सुकता वाटतेय की, आता या व्हायरल एक्सप्लोजनसाठी कोणाला जबाबदार धरलं जाणार आहे.' राम गोपाल वर्मा यावर थांबले नाही तर त्यांनी आणखी एक ट्वीट करत टीका केली आहे. त्यांनी लिहिलं, 'अभिनंदन इंडिया! लॉकडाऊनला आता नवीन नाव देण्यात आलं आहे 'ब्रेक द चेन' व्वा, आणि सर्वांना या नामकरणाच्या कार्यक्रमात या सुचनेसह बोलावण्यात आलं आहे की, कुंभ मेळ्यातून परतणाऱ्या लोकांनी मास्क नाही वापरला तरी चालेल कारण ते आपला व्हायरस आधीच गंगेत धुवून आले आहेत.' आपल्या तिसऱ्या ट्वीटमध्ये राम गोपाल वर्मा यांनी मागच्या वर्षी दिल्लीमध्ये झालेल्या जमात वादाचं उदाहरण देत म्हटलं हिंदूंनी मुस्लीमांची माफी मागावी असं म्हटलं आहे. त्यांनी लिहिलं, 'मार्च २०२० मध्ये करोनाला मोठ्या प्रमाणावर प्रसार करणारी दिल्लीतील जमात ही बाहुबली कुंभमेळ्याच्या समोर एका शॉर्ट फिल्मसारखी होती. सर्व हिंदूंनी मुस्लीमांची माफी मागायला हवी. कारण त्यांनी हे सर्व तेव्हा केलं जेव्हा आपल्याला करोनाबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि आपण हे अशावेळी करत आहोत जेव्हा आपल्याला करोनाचे गंभीर परिणाम माहीत आहेत.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dgBxmR