मुंबई- भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन युद्ध झालीत. त्यातील १९७१ मध्ये झालेल्या युद्धातील हिरोंमध्ये यांचे नाव अजरामर झाले. हे युद्ध माणकेशॉ यांच्या नेतृत्वाखाली लढले गेले होते. या युद्धामध्ये पाकिस्तानची फाळणी होऊन बांग्लादेशाची स्थापना झाली होती. माणेकशॉ यांच्या कर्तृत्वावर आधारित करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली गेली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर माणकेशॉ यांची भूमिका साकारत आहे. माणकेशॉ यांच्या आजच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी या बायोपिकच्या नावाची घोषणा केली आहे. या बायोपिकचे नाव '' असे आहे. पाकिस्तानविरुद्ध १९७१ चे युद्ध जिंकल्यानंतर फिल्ड मार्शल सॅम माणकेशॉ यांना 'SAM बहादूर' या नावाचे हाक मारली जात होती. सर माणकेशॉ ४० वर्षांच्या लष्करी सेवेत पाच युद्धांमध्ये सहभागी झाले होते. भारतीय लष्करामधील फिल्ड मार्शल ही पोस्ट मिळालेले ते पहिले अधिकारी होते. विकी कौशलने आपल्या पालकांकडून माणकेशॉ यांच्या शौर्याच्या कथा ऐकल्या होत्या. परंतु त्याने जेव्हा सिनेमाची पटकथा वाचली तेव्हा तो भारावून गेला. माणकेशॉ हे खऱ्या अर्थाने हिरो आणि देशभक्त होते त्यामुळेच आजही त्यांना तितकेच प्रेम आणि सन्मान मिळत आहे. त्यांची भूमिका साकारायला मिळणे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया विकीने व्यक्त केली आहे. या आधीच विकी कौशलचा या सिनेमातील लुक प्रसिद्ध झाला होता. त्याचा हा लुक तुफान व्हायरल झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत. सर माणकेशॉ यांची कथा सिनेमाद्वारे साकारायला मिळत असल्याचा सार्थ अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uwV8Ft