Full Width(True/False)

अमृता सुभाषनं केलं कार्तिक आर्यनचं कौतुक, सांगितला मजेदार किस्सा

मुंबई: काही दिवसांपूर्वीच अभिनेता कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेल्या 'धमाका' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. त्यानंतर त्याच्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. टीझरमध्ये दिसलेल्या पत्रकाराच्या भूमिकेतील कार्तिकच्या लुकनं त्याच्या महिला चाहत्यावर्गाला वेगळीच भूरळ घातली आहे. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अमृतानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कार्तिकच्या अभिनय कौशल्याचं कौतुक करत त्याच्याबद्दल एक मजेदार किस्सा सुद्धा शेअर केला. गली बॉय, सेक्रेड गेम्स, बॉम्बे बेगम अशा चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अमृता कार्तिकच्या 'धमाका'मध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. पण कार्तिकसोबत काम करणारी अमृता आता त्याचीच चाहती झाली आहे. नुकत्याच 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत अमृतानं कार्तिकचं खूप कौतुक केलं आहे आणि यासोबतच तिनं कार्तिकबद्द एक मजेदार किस्सा सुद्धा सांगितला. जेव्हा चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. त्यावेळी कार्तिकच्या महिला चाहत्यांचे मेसेज अमृताला येत असत. ज्यांना त्याच्याबाबत खूप जाणून घ्यायचं होतं. यावर अमृता म्हणते, 'त्याचा महिला चाहतावर्ग पाहिल्यावर मी स्तब्ध झाले. अशाप्रकारच्या त्याच्या स्टारडमसाठी मी खूप खूश आहे. मला त्याचा अभिमान वाटतो आणि माझं प्रेम त्याच्यासोबत नेहमीच राहिल.' 'धमाका' चित्रपटातील कार्तिकच्या अभिनयाबाबत बोलताना अमृता म्हणाली, 'तो खूपच सरळ आणि स्वाभाविक अभिनेता आहे. पण त्याहूनही तो एक माणूस म्हणून अधिक चांगला आहे. त्याच्यासोबत काम करून मला खूप छान वाटलं. तो स्वतःच्या एक-एक डायलॉगसाठी खूप मेहनत घेतो. ही गोष्ट आताच्या युवा अभिनेत्यांमध्ये फार कमी पाहायला मिळते. संघर्ष करून एक लोकप्रिय अभिनेता होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास खरंच कौतुकास्पद आहे. ऑडिशन देण्यासाठी त्यानं ट्रेनमधून प्रवास केला आहे. आज त्याची स्वप्न साकार होत आहेत. जेव्हा चित्रपटाची रिलीज डेट जवळ येईल तेव्हा मी यावर विस्तारानं बोलेन. कारण मी त्याच्याबद्दल जेवढं बोलेन तेवढं कमीच आहे.' कार्तिकबद्दल बोलायचं तर तो सध्या करोना पॉझिटिव्ह असून त्यावर उपचार घेत आहे. त्यानं काही दिवसांपूर्वीच 'भुलभुलैया २'चं शूटिंग पूर्ण केलं होतं. तर काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या बॉम्बे बेगममध्ये खास भूमिकेत दिसली होती. ती लवकरच कार्तिकच्या 'धमाका'मध्ये दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31KUAzo