Full Width(True/False)

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक तारिक शाह यांचं निधन

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक यांचं आज मुंबई येथे निधन झालं. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात तारिक शाह यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या दोन वर्षांपासून त्यांच्या किडनीचा आजार होता असं म्हटलं जात आहे. प्रसिद्ध अभिनेत्री यांचे ते पती होते. तारिक आणि शोमा यांना साराह नावाची एक मुलगी आहे. मीडिया रिपोर्टनुसार जेव्हा शोमा यांनी तारिक यांना फोन केला होता मात्र तो साराहने उचलला आणि त्यावेळी तिनं तारिक यांच्या निधनाची माहिती शोमा यांना दिली. सूत्रांच्या माहितीनुसार डबल न्यूमोनियामुळे तारिक यांचं निधन झालं. तारिक यांनी 'कडवा सच' या मालिका आणि 'जन्म कुंडली' या चित्रपटासाठी काम केलं होतं. तारिक शाह यांनी अभिनेता म्हणून 'बहार आने तक', 'मुंबई सेंट्रल', 'एहसास', 'गुमनाम है' या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप प्रेक्षकांवर सोडली होती. तारिक शाह यांनी 'जन्म कुंडली' आणि 'बाहर आने तक' या चित्रपटांच दिग्दर्शनही केलं होतं. याशिवाय त्यांनी 'कडवा सच' या मालिकेचं दिग्दर्शन आणि निर्मिती सुद्धा केली होती. असं म्हटलं जातं की, तारिक शाह यांच्यातील कौशल्य दिलीप कुमार यांनी ओळखलं होतं. तारिक शाह यांनी जास्त चित्रपटांमध्ये काम केलं नाही मात्र त्यांची पत्नी शोमा आनंद या मात्र अभिनय क्षेत्रात कार्यरत राहिल्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cL78Nb