मुंबई: '' मालिकेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मालिकेच्या मीम्सचाही धुमाकूळ पाहायला मिळतोय. मालिकेती एसीपी हे पात्र देखील सोशल मीडियावर चर्चेत आहे. दिव्या सिंगची प्रचंड खिल्ली उडवली जात असून मालिकेवर टीका करण्यात येत आहे. असं असलं तरी दिव्या सिंगची भूमिका साकारणारी अभिनेत्री हिचा चाहता वर्ग वाढला आहे. शिकारी,बॅड गर्ल, काळे धंदे, हाफ ट्रुथ, गुरुकुल, बियॉन्ड बॉर्डर्स सारख्या चित्रपटांत नेहा खाननं यापूर्वी काम केलं आहे. पण 'देवमाणूस' मालिकेमुळे ती घराघरांत पोहचली आणि खऱ्या अर्थानं तिला ओळख मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत नेहानं तिच्या संघर्षाबद्दल सांगितलं. घरात कोणतीही अभिनय क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना तिनं या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. घरची परिस्थिती अगदी बेताची होती. आई मराठी, तर वडील मुस्लीम.दोघांनी प्रेमविवाह केल्यानं दोघांच्या घरच्यांनी स्वीकारलं नव्हतं. वडिलांची संपत्ती आईला मिळू नये यासाठी आईवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात तिच्या शरीरावर तब्बल ३७० टाके पडले. या हल्ल्यासाठी जबाबदार ठरवतील आणि आळ घेतील या भीतीनं वडिल देखील फरार झाले होते. यानंतर आईनेच तिचा आणि भावंडांचा सांभाळ केला', असं नेहानं सांगितलं. घरात आरसाही नव्हताघरात कोणही या क्षेत्रात नव्हतं. शेजारच्या एक काकू नेहाला फोटो स्टुडिओमध्ये घेऊन गेल्या आणि त्यांनी तिचे फोटो काढून घेतले. फोटोग्राफरला तिचे फोटो इतके आवडले की, त्यानं तिचे फोटो पेपरमध्ये देण्यासाठी परवानगी मागितली. त्यानंतर खऱ्या अर्थानं तिची याक्षेत्राकडे वाटचाल सुरू झाली, असं नेहा सांगते. मुंबईत आल्यानंतर अनेक ऑडिशन्स दिल्यानंतर अमरजीत यांच्याशी नेहाशी ओळख झाली. त्यांनी तिला मदत केली आणि युवा हा जिमी शेरगिलसोबत पहिला सिनेमा मला मिळाला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39SvFOE