मुंबई- देशात करोनाने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढते आहे. महाराष्ट्रसह देशातील इतर राज्यांमध्येही लॉकडाउन लावण्यात आलं आहे. या सर्व परिस्थितीचा फटका पुन्हा एकदा बॉलीवूडला बसताना दिसत आहे. करोनामुळे बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता याच्या '' चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर गेलं आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंबंधी माहिती दिली आहे. हा चित्रपट सलमान खानच्या ': युअर मोस्ट वॉण्टेड भाई' सोबत ईदच्या मुहूर्तावर म्हणजे १२मे रोजी प्रदर्शित होणार होता. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सध्याची परिस्थिती बघता चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं, 'सध्याची परिस्थिती खूप गंभीर आहे. या संकटाच्या वेळेस प्रेक्षकांचं आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. या गोष्टीची लक्षात घेऊन आम्ही आमचा आगामी चित्रपट 'सत्यमेव जयते २' च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाशी संबंधित माहिती तुम्हाला देत राहून. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. दोन फुटांचं अंतर आणि मास्क लावा. स्वतःची आणि घरातल्यांची काळजी घ्या. जय हिंद!' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल यात कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या चित्रपटात जॉन सोबत दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची निर्मिती एम्मे एंटरटेनमेंट आणि टी सीरिज यांनी केली आहे. काही प्रेक्षकांच्या मते जॉनच्या चित्रपटाला सलमानच्या 'राधे' चित्रपटाचाही फटका बसला आहे. 'राधे' देखील ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार असल्याने 'सत्यमेव जयते २' च्या कमाईवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vkm4IM