Full Width(True/False)

Covid-19 ची लस घेतानाचा फोटो पोस्ट करा अन् मिळवा ५ हजार रुपये, सरकार देत आहे बक्षीस

नवी दिल्लीः कोविड १९ ची लस तुम्ही घेत असाल तर तुम्हाला ५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यासाठी फक्त तुम्हाला लस घेतेवेळी एक फोटो क्लिक करायचा आहे. त्या फोटोला पोस्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही ५ हजार रुपये जिंकू शकता. हे बक्षीस सरकारकडून देण्यात येत आहे. वाचाः खरं म्हणजे, कडून लस घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी एक मोहीम चालवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत जर कोणी व्यक्ती किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्ती लस घेत असलेला फोटो शेयर करीत असेल तसेच त्यासोबत एक चांगली टॅगलाइन देत असेल तर अशा व्यक्तीला सरकारकडून ५ हजार रुपये जिंकण्याची संधी मिळत आहे. वाचाः कसे जिंकू शकतात ५ हजार रुपये My Gov च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाही एका सदस्याने लस घेत असलेला फोटो एका चांगल्या टॅगलाइन सोबत शेयर केल्यास या टॅगलाइनमध्ये लसीचे महत्त्व कसे आहे, यासंबंधी माहिती देणे आवश्यक आहे. यातून जगाला प्रोत्साहन मिळायला हवे. प्रत्येक महिन्यात यात १० चांगल्या टॅगलाइनचा वापर करणाऱ्यास ५-५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते. वाचाः सेल्फी शेयर करताना हे लक्षात ठेवा या मोहिमेचा अखेरचा दिवस ३१ डिसेंबर आहे. जर तुम्हाला यात सहभागी व्हायचे असेल तर फोटो हा लस घेतानाचा असला पाहिजे. या दरम्यान, कोविडच्या सर्व नियमांचे पालन करायला हवे. ज्यात मास्कचा समावेश आहे. लससाठी असा करा अप्लाय जर तुम्हाला लस घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही http://cowin.gov.in च्या वेबसाइटवर जाऊन अडवॉन्स्ड अपॉइंटमेंट घेऊ शकता. तसेच लससाठी ऑन साइट रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता. याशिवाय तुम्ही पोर्टल किंवा आरोग्य सेतु अॅपवर रजिस्ट्रेशन किंवा अपॉइंटमेंट बुक करू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ef5BOZ