Full Width(True/False)

Google Doodle of Vera Gedroits: रशियातील पहिली महिला सर्जन यांच्या जयंतीदिनी गुगलने बनवले खास डुडल

नवी दिल्लीः : इंटरनेट संर्च इंजिन कंपनी Google ने आज रशियाची पहिली महिला सर्जन ला खास सन्मानित केले आहे. गुगलने आज वेरा यांच्या १५१ व्या जन्मदिवस निमित्त खास डुडल बनवले गेले आहे. डॉ. वेरा इग्नटिवेना गेड्रोइट्स रशियाची डॉक्टर ऑफ मेडिसिन होती. त्या आपल्या देशातील पहिली महिला सर्जन होत्या. एक सर्जन असून त्या प्राध्यापक, कवी व लेखिका सुद्धा होत्या. त्यांनी युद्ध चिकित्सक या क्षेत्रात अनेक लोकांचा जीव वाचवण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना संपूर्ण जगभरात ओळखले जाते. वाचाः रशियात हायजीन, पोषण युक्त जेवणावरून सर्वात पहिला गेड्रोइट्स यांनी आवाज उठवला. गेड्रोइट्स यांचा जन्म १९ एप्रिल १८७० रोजी कीव मध्ये झाला. त्या ठिकाणी शाही वंश लिथुआनियाईशी संबंध होता. त्यावेळी कीव रशियाचा साम्राज्याचा भाग होता. गेड्रोइट्सने आपले मेडिकलचे शिक्षण स्वित्झर्लंडमधून केले व त्या डॉक्टर बनल्या. त्यानंतर देशात परतल्यानंतर आपल्या करियरच्या सुरुवातीला एक फॅक्ट्री हॉस्पिटलमध्ये काम सुरू केले. वाचाः गेड्रोइट्स यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. सर्जन व प्राध्यापक असून त्यांनी संशोधन पेपरमध्ये अनेक लिखान केले. त्या एक चांगल्या कवी आणि लेखिका सुद्धा होत्या. त्यांनी आपली बायोग्राफी १९३१ रोजी लिहिली होती. त्याचे नाव Life होते. १९३२ मध्ये वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांचे कीव मध्ये निधन झाले. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3duiUMD