नवी दिल्लीः Earbuds: हँडसेट निर्माता कंपनी Realme आपले नवीन ट्रूली वायरलेस ईयरबड्सला लाँच करण्याची तयारी करीत आहे. कंपनीने लाँचची तारीखची माहिती ट्विट वरून दिली आहे. रियलमी बड्स एयर २ नियोला अॅक्टिव नॉइस कॅन्सिलेशन (ANC) टेक्नोलॉजी सोबत उतरवले जाऊ शकते. याशिवाय, कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सिंगल चार्जवर हे इयरबड्स २८ तास पर्यंत बॅटरी लाइफ ऑफर करतील. वाचाः ट्विट सोबत एक फोटो शेयर करण्यात आला आहे. याला पाहिल्यानंतर Realme Buds Air 2 Neo ची डिझाइनची झलक पाहायला मिळते. रियलमी पाकिस्तानच्या ट्विटर अकाउंटवरून रियलमी बड्स एयर २ नियोच्या तारखेची माहिती दिली आहे. सोबत नवीन ईयरबड्स 10mm डायनामिक बास बूस्ट ड्राइवर्स आणि एएनसी सपोर्ट सोबत येणार आहेत. वाचाः कंपनीने यावरून पडदा उठवला आहे की, रियलमी बड्स एयर २ नियो २८ तासांचा एकूण प्लेबॅक टाइम देईल. Realme Buds Air 2 सोबत २५ तासंची बॅटरी लाइफ मिळते. याचाच अर्थ लेटेस्ट ईयरबड्स ३ तासांची जास्त बॅटरी लाइफ ऑफर करते. कंपनीकडू शेयर करण्यात आलेल्या फोटो वरून हेही उघड झाले आहे की, Realme Buds Air 2 Neo चे डिझाइन Realme Buds Q मिळते जुळते आहे. कंपनीकडून शेयर करण्यात आलेल्या रियलमी बड्स एयर २ नियो व्हाइट कलर ऑप्शनमध्ये दिसते. वाचाः या आठवड्यात पाकिस्तानात या लेटेस्ट बड्सला उतरवले जात आहे. परंतु, कंपनीने याची माहिती दिली नाही. ईयरबड्सला ग्लोबल मार्केटमध्ये उतरवले जाणार की नाही, याची माहिती दिली नाही. फेब्रुवारी मध्ये कंपनीने भारतात Realme Buds Air 2 ला ३ हजार २९९ रुपयांच्या किंमती सोबत लाँच केले होते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QX28g3