मुंबई: बॉलिवूड अभिनेता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि आगमी चित्रपटांचे अपडेट सोशल मीडियावरून चाहत्यांशी शेअर करताना दिसतो. आताही अर्जुननं इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोंमध्ये काय फरक आहे असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे. पण अर्जुनच्या या फोटोवर त्याची बहीण जान्हवी कपूरनं केलेली मजेदार कमेंट मात्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. जान्हवीची ही कमेंट सगळीकडे खूप व्हायरल झाली आहे. अर्जुन कपूरनं इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो वरवर पाहता सारखेच दिसत आहेत. म्हणजे अर्जुननं एकाच पोझमधील दोन फोटो शेअर केले आहेत. त्याचे कपडे, बसण्याची स्टाइल, गादी सर्वकाही सारखंच आहे. पण यात एक छोटासा फरक आहे. तो सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर हावभावांमध्ये. काही चाहत्यांनी त्याच्या नजरेतील फरक सांगितला तर काहींना त्याच्या स्माइलमध्ये फरक असल्याचं सांगितलं. पण सर्वांत मजेदार कमेंट ठरली ती अभिनेत्री आणि अर्जुनची बहीण जान्हवी कपूरची. जान्हवी कपूरनं अर्जुनच्या फोटोंवर कमेंट करत त्यातील सर्वात मजेदार फरक सांगितला आहे. तिनं लिहिलं, 'पहिला फोटो ज्यात तू विचार करत आहेस की, डायनिंग टेबलजवळचं तुझं कथ्थक संपलं आहे आणि दुसरा फोटो ज्यात तू विचार करत आहेस की, आता मी परत कधी सुरू करणार.' जान्हवीची ही मजेदार कमेंट वाचल्यावर अर्जुनलाही हसू आवरेनासं झालं त्यानं तिला रिप्लाय देताना व्वा! असं म्हणत हसणाऱ्या इमोजी पोस्ट केल्या आहेत. आणि खुशी कपूर या दोघीही अर्जुन कपूरच्या सावत्र बहीणी आहेत. मात्र अर्जुन नेहमीच त्यांची खूप काळजी घेताना दिसतो. अर्जुन त्यावेळी खूपच लहान होता. जेव्हा त्यानं त्याच्या आई-बाबांना वेगळं होताना पाहिलं होतं. बोनी कपूर यांनी जान्हवी आणि खूशीची आई श्रीदेवी यांच्याशी लग्न केल्यानंतर अर्जुन बराच काळ डिप्रेशनमध्येही होता. पण श्रीदेवी यांच्या निधनानंतर मागच्या सर्व गोष्टी विसरून अर्जुननं जान्हवी आणि खुशीला सांभाळलं. मोठा भाऊ म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39OgEgV