नवी दिल्लीः इंडियन प्रीमियर लीग २०२१ () ला ९ एप्रिलपासून सुरूवात झाली आहे. तुम्ही जर क्रिकेटचे चाहते असाल आणि एअरटेल युजर्स असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. एअरटेल युजर्संना डिज्नी प्लस हॉटस्टारचे वेगळे सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही. टेलिकॉम आपल्या अनेक रिचार्ज प्लानसोत फ्री मध्ये डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन देत आहे. वाचाः Airtel ज्या प्लान्ससोबत तुम्हाला फ्री Disney+ Hotstar सब्सक्रिप्शन देते. त्याची किंमत ४०१ रुपये, ५९९ रुपये आणि २६९८ रुपये आहे. सुरुवातीच्या ४०१ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला एक डेटा पॅक मिळतो. यात २८ दिवसांची वैधता आहे. सोबत ३० जीबी डेटा दिला जातो. यासोबतच फ्री मध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार VIP सब्सक्रिप्शनची वैधता १ वर्षासाठी मिळते. वाचाः ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता मिळते सोबत डेली २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय या पॅकमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० एसएमएस फ्री दिले जाते. या प्लानमध्ये तुम्हाला वर्षभरासाठी Disney+ Hotstar VIP सब्सक्रिप्शन फ्री मध्ये मिळते. २६९८ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला एक वर्षापर्यंत रोज २ जीबी डेटा दिला जातो. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० फ्री एसएमएस मिळते. याशिवाय या प्लानमध्ये १ वर्षासाठी Disney+ Hotstar VIP सब्सक्रिप्शन दिले जाते. Disney+ Hotstar VIP सब्सक्रिप्शनची किंमत ३९९ रुपये आहे. या सब्सक्रिप्शन मध्ये सिनेमा, मूवी, स्पोर्ट्स, डिजनी+ चे किड्स केंटेंटचे अॅक्सेस मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d8f9wa