नवी दिल्लीः LG ने नुकतीच एक घोषणा केली असून ३१ जुलै पासून कंपनी स्मार्टफोन बिझनेस पूर्णपणे बंद करीत असल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या या घोषणेनंतर आधीच चिंताग्रस्त असलेल्या युजर्संना आता कंपनीने आणखी एक धक्का दिला आहे. दक्षिण कोरियाच्या कंपनीने म्हटले की, युजर्संना ३ वर्षापर्यंत सॉफ्टवेयर अपडेट देणार तर दुसऱ्या मिड रेंज स्मार्टफोनला केवळ २ वर्षपर्यंत अपडेट्स मिळणार आहेत. वाचाः तीन वर्षापर्यंत अँड्रॉयड ओएस अपडेट जी आणि व्ही सीरीज स्मार्टफोन युजर्ससाठी मिळणार आहेत. ज्यात LG V50, LG G8 सीरीज, LG V60, LG वेलवेट आणि एलजी विंगचा समावेश आहे. तर दोन वर्षापर्यंत अपडेट्सच्या यादीत LG Stylo, LG K61, LG K51S आणि LG K41S या स्मार्टफोनचा समावेश आहे. एलजीने एक आठवड्यापूर्वीच याची घोषणा केली होती की कंपनी कायमस्वरुपी आपला स्मार्टफोन बिजनेस बंद करणार आहे. ब्रँडने म्हटले होते की, ३१ जुलै पासून हा बिझनेस पूर्णपणे बंद केला जाणार आहे. परंतु, स्टॉकमध्ये जे स्मार्टफोन उरले आहेत. त्याची विक्री सुरू ठेवण्यात येणार आहे. वाचाः LG च्या स्मार्टफोन बिझनेला गेल्या ६ वर्षापासून नुकसान सोसावे लागत होते. त्यामुळे ब्रँड आपले जास्त नवीन मोबाइल लाँच करीत नव्हते. परंतु, मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या दुसऱ्या स्मार्टफोन्स प्रमाणे एलजीच्या फोन कडे ग्राहकांचे जास्त लक्ष गेले नाही. दुसऱ्या कंपनी युजर्संना लेटेस्ट टेक्नोलॉजी देत आहे. एलजी कंपनी मात्र यात मागे पडली. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OxHLVY