नवी दिल्लीः आजपासून म्हणजेच ९ एप्रिल २०२१ पासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची सुरुवात होत आहे. IPL चे सर्व सामन्यांचे थेट प्रेक्षपण Disney+ Hotstar वर पाहिले जाऊ शकते. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज अशा काही प्लानसंबंधी माहिती देणार आहोत. ज्यात तुम्हाला Disney+ Hotstar चे वर्षभराचे सब्सक्रिप्शन फ्री मिळू शकते. हे रिलायन्स जिओकडून दिले जात आहे. वाचाः जिओ आपल्या सर्व पोस्टपेड प्लानमध्ये IPL पाहण्याची सुविधा देत आहे. याशिवाय कंपनीने चार असे प्रीपेड प्लान आणले आहेत. ज्यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा सोबत ३९९ रुपयांचे Disney+ Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन फ्री मध्ये दिले जाऊ शकते. यावर आयपीएल मॅचचे लाइव्ह प्रेक्षेपण पाहू शकता. जाणून घ्या संबंधी सर्वकाही. वाचाः ४०१ रुपयांच्या प्लानमध्ये 90GB डेटा आणि सर्वकाही जिओचा हा क्रिकेट प्लान असून याची वैधता २८ दिवसांची आहे. यात तुम्हाला रोज ३जीबी डेटा आणि एक्स्ट्रा ६ जीबी डेटा मिळणार आहे. याचाच अर्थ तुम्हाला एकूण ९० जीबी डेटा मिळू शकणार आहे. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि प्रतिदिन 100 SMS मिळणार आहे. ५९८ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणार 112GB डेटा आणि सर्वकाही फ्री या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. यात तुम्हाला रोज २ जीबी डेटा आणि १०० SMS मिळतील. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर 64 Kbpsची स्पीड मिळेल. वाचाः जिओचा ७७७ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला रोज १.५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय एक्स्ट्रा ५ जीबी डेटा मिळतो. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर याची स्पीड 64 Kbps राहते. अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज 100 SMS मिळते. या प्लानमध्ये वर्षभर सर्वकाही फ्री या प्लानमध्ये तुम्हाला ३६५ दिवसासाठी 740GB डेटा मिळणार आहे. ज्यात तुम्हाला रोज २ जीबी डेटा आणि एक्स्ट्रा १० जीबी डेटा मिळणार आहे. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर 64 Kbps ची स्पीड ने इंटरनेट मिळू शकणार आहे. याशिवाय अनलिमिटेड व्हाइस कॉल आणि रोज 100 SMS मिळेल. या प्लानची किंमत २५९९ रुपये आहे. या सुविधेसह तुम्ही या प्लानमध्ये Disney+ Hotstar सोबत सर्व जिओचे JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud चे सब्सक्रिप्शन फ्री मध्ये मिळू शकतील. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PNhRya