Full Width(True/False)

ठरलं! Moto G60 आणि Moto G40 Fusion स्मार्टफोन भारतात 'या' दिवशी होणार लाँच

नवी दिल्लीः Motorola ने अखेर भारातत Moto G60 आणि MotoG40 Fusion च्या लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. कंपनीने फ्लिपकार्टवर याची माहिती दिली आहे. या स्मार्टफोन्सला देशात २० एप्रिल रोजी लाँच करण्यात येणार आहे. लाँच आधीच Moto G60 आणि स्मार्टफोनसाठी फ्लिपकार्टवर Notify Me पेज बनवण्यात आले आहे. मोटो जी ६०चे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे यात देण्यात आलेला १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. वाचाः मोटोरोला इंडियाने याआधी ट्विटरवर आगामी स्मार्टफोनच्या डिझाइनचा खुलासा केला होता. कंपनीने ट्विटरवर सांगितले होते की, कंपनी लवकरच मोटो जी ६० आणि मोटो जी ४० फ्यूजनचे फीचर्सची माहिती उघड करणार आहे. वाचाः मोटो जी ६० आणि मोटो जी ४० फ्यूजनची डिझाइन एकसारखीच आहे. फोनमध्ये रियरवर तीन कॅमेरे दिले आहेत. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, या फोन्सच्या वैशिष्ट्यांत खूप सारा फरक नाही. दोन्ही फोनला आधीच गीकबेंचवर लिस्ट करण्यात आलेले आहे. या लिस्टिंग नुसार, मोटो जी ६० ने सिंगल कोर टेस्ट मध्ये ५१५ तर मल्टी कोर टेस्टमध्ये १४२५ स्कोर केले आहे. वाचाः Moto G60, Moto G40 Fusionचे फीचर्स मोटो जी ६० मध्ये ६.८ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोनमध्ये पुढच्या बाजुने पंचहोल कटआउट दिले आहे. त्यावर ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३२ जी प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी पर्यंत रॅम दिला आहे. मोटो जी ६० मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. जो १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, ८ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि एक डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 6000mAh ची बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. स्मार्टफोन अँड्रॉयड ११ वर काम करतो. मोटो जी ४० फ्यूजन मध्ये हेच फीचर्स दिले आहेत. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर च्या ऐवजी ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uTOIQP