नवी दिल्लीः मोटोरोलाने भारतात काही दिवसांपूर्वी आपले दोन नवीन स्मार्टफोन आणि ला लाँच केले होते. आता बातमी येत आहे की, कंपनी भारतात आपली प्रसिद्ध जी सीरीज अंतर्गत आणखी दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. ही माहिती टिप्स्टर मुकुल शर्मा यांनी एका ट्विट मधून दिली आहे. या ट्विट मध्ये लाँच होणाऱ्या दोन्ही स्मार्टफोनपैकी एका स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये संबंधी माहिती देण्यात येत आहे. वाचाः ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मुकुल शर्मा यांच्या माहितीनुसार, या दोन्ही स्मार्टफोनपैकी एका फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप ऑफर करणार आहे. ज्यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असणार आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये कंपनी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा ऑफर करणार आहे. मुकुल शर्मा यांनी सांगितले की, फोनच्या रियरमध्ये तीन कॅमेरे असणार आहे. परंतु, यात एक लेन्स मध्ये दोन फंक्शन दिले आहे. अपकमिंग मोटो जी सीरीजच्या दुसऱ्या स्मार्टफोन संबंधी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. वाचाः असू शकतो मोटो G60 सारखा काही रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, कंपनी सध्या Moto G60 नावाच्या डिव्हाइसवर काम करीत आहे. शर्माने जो लीक शेयर केला आहे. त्यात मोटो जी ६० चे रेंडर शी मिळती जुळती असू शकते. 120Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले या फोनमध्ये कंपनी 120Hz चे रिफ्रेश रेट सोबत ६.७८ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले ऑफर करू शकते. फोन ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबीचे UFS 2.1 स्टोरेज सोबत येऊ शकते. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये कंपी स्नॅपड्रॅगन ७३२ जी चिपसेट ऑफर करू शकते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा HM2 प्रायमरी कॅमेरा शिवाय, एक ८ मेगापिक्सलचा आणि एक २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे. वाचाः मोटो G40 फ्यूजन मध्ये जवळपास हेच सर्व फीचर फोनचे एक व्हेरियंट आहे. ज्याचे नाव Moto G40 Fusion आहे. यात प्रोसेसर, डिस्प्ले किंवा बॅटरी आहे. हा फोन दोन व्हेरियंट मध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज मध्ये आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. फोनच्या रियरमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. फोनमध्ये एक ८ मेगापिक्सलचा आणि एक २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fZDbLz