मुंबई: बॉलिवूड गायिका नेहा कक्करनं फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचं प्रत्येक गाण हिट होताना दिसतं ज्यामुळे तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असलेली पाहायला मिळतेय. पण नेहा आता ज्या ठिकाणी आहे तिथंपर्यंत पोहोचायला तिला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. सध्या ज्या इंडियन आयडॉल शोमध्ये ती परीक्षक म्हणून काम पाहत आहे. एकेकाळी या शोमध्ये तिनं स्पर्धक म्हणून एंट्री केली होती. सोशल मीडियावर सध्या नेहा कक्करचा एका जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. जेव्हा ती इंडियन आयडॉलच्या ऑडिशनसाठी आली होती तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. या शोच्या ऑडिशनसाठी जेव्हा नेहानं गाणं गायलं होतं त्यावेळी तिचं गाणं ऐकून परीक्षक यांनी तिला अशी प्रतिक्रिया दिली होती. ज्यामुळे सर्वच हैराण झाले होते. ते म्हणले होते, 'हे कसं गातेयस तू मला तर स्वतःच्याच कानाखाली मारावं असं वाटतंय.' अनु मलिक यांचं अशा अंदाजात प्रतिक्रिया देणं अनेक प्रश्न उपस्थित करतं. पण हा व्हिडीओ अर्धवट असल्यानं या बाबत कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही. कारण अनेकदा अशा गंभीर प्रतिक्रिया देतात आणि नंतर ती मस्करी असल्याचं म्हटलं जातं. त्यांनी अनेकदा स्पर्धकांसोबत अशाप्रकारे मस्करी केली आहे. अगोदर त्यांना अशाप्रकारे ओरडून नंतर त्यांचं कौतुक करतात. तसं पाहायला गेलं तर नेहाच्या ऑडिशनचे आणखी काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या नेहा इंडियन आयडॉल १२साठी परीक्षक म्हणून काम पाहत आहे. नेहाच्या करिअर बद्दल बोलायचं तर तिनं आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3248QDd