नवी दिल्लीः ओप्पोने मार्केट मध्ये आपला नवीन स्मार्टफोन ला लाँच केले आहे. चीनमध्ये लाँच करण्यात आलेला हा फोन ओप्पो A15s चे रीब्रँडेड व्हर्जन आहे. ओप्पो A15s ला गेल्या डिसेंबर महिन्यात भारतात लाँच करण्यात आले होते. ओप्पो A35 च्या किंमतीसंबंधी सध्या कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. आइस जेड व्हाइट, ग्लास ब्लॅक, आणि मिस्ट ब्लू कलर ऑप्शन मध्ये लाँच करण्यात आलेल्या या फोनचा सेल चीनमध्ये लवकरच सुरू होणार आहे. वाचाः ओप्पो A35 चे फीचर्स फोनमध्ये 720x1600 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५२ इंचाचा एचडी प्लस IPS LCD वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आणि रिफ्रेश रेट 60Hz आहे. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून मीडियाटेक हीलियो पी ३५ चिपसेट दिले आहे. रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरच्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः फोनला पॉवर देण्यासाठी यात 4230mAh ची बॅटरी दिली आहे. जी १० वॉटची चार्जिंगला सपोर्ट करते. मायक्रो एसडी कार्डच्या सपोर्ट शिवाय, या फोनध्ये अँड्रॉयड ११ वर बेस्ड Color OS 7.2 दिले आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 4G VoLTE, वाय-फाय 802.11 b/g/n, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आहे. 3.5mm हेडफोन जॅक सारखे ऑप्शन दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wR7xpv