नवी दिल्लीः सॅमसंगने भारतात गॅलेक्सी एफ १२ आणि गॅलेक्सी एफ ०२ स्मार्टफोनला लाँच केले आहे. सॅमसंगचे हे दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोन गॅलेक्सी एम १२ आणि गॅलेक्सी एम०२ एसचे रिब्रँडेड व्हर्जन आहेत. मध्ये एक्सीनॉस ८५० प्रोसेसर, 6000mAh बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा सेटअप यासारखे फीचर्स दिले आहेत. तर मध्ये रियरवर ट्रिपल कॅमेरा सेटअप, ६४ जीबी स्टोरेज यासारखे खास फीचर्स दिले आहेत. Samsung Galaxy F12 आणि Galaxy F02s: किंमत सॅमसंग एफ १२ ला लाँच अंतर्गत कमी किंमतीत देशात उपलब्ध करण्यात आले आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटला ९ हजार ९९९ रुपये किंमतीत तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजला १० हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. यात ICICI बँक क्रेडिट आणि ईएमआय ट्रान्झॅक्शन द्वारे फोन खरेदी केल्यास १ हजार रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळू शकतो. फोनला सेलेस्टियल ब्लॅक, स्काय ब्लू आणि सी ग्रीन कलर मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. लाँच ऑफर संपल्यानंतर हँडसेटच्या दोन्ही व्हेरियंटला अनुक्रमे १० हजार ९९९ रुपये आणइ ११ हजार ९९९ रुपयात उपलब्ध करण्यात येणार आहे. गॅलेक्सी एफ १२ चा सेल भारतात १२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या अधिकृत वेसबाइटवर सुरू होणार आहे. Samsung Galaxy F12 चे फीचर सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास ३ दिला आहे. हँडसेट मध्ये एक्सीनॉस ८५० प्रोसेसर, ४ जीबी रॅम सोबत ६४ जीबी वर १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवले जाऊ शकते. फोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड वन यूआय ३.१ कस्टम स्किन सोबत येते. फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी गॅलेक्सी एफ १२ मध्ये 4G LTE, ड्यूल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस सारखे ऑप्शन दिले आहेत. फोनमध्ये साइडला फिंगरप्रिंट सेन्सर मिळते. स्मार्टफोनमध्ये डॉल्बी एटमॉस आणि वाइडवाइ एल वन सर्टिफिकेशन मिळते. फोनमध्ये रियरवर ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ व मायक्रो सेन्सर दिले आहेत. गॅलेक्सी एफ मध्ये सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. Samsung Galaxy F02s:चे फीचर सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले दिला आहे. हँडसेट मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४५० चिपसेट दिला आहे.च फोनला ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम सोबत ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवले जाऊ शकते. या फोनमध्ये रियरवर १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ लेन्स दिला आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4G LTE, वाई-फाई, ब्लूटूथ, जीपीएस, 3.5 एमएम ऑडियो जॅक आणि यूएसबी टाइप-सी फीचर्स दिले आहेत. फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dEsRpD