मुंबई : बॉलिवूडमधील हरहुन्नरी कलाकार यांचे गेल्यावर्षी निधन झाले. आजही इरफान खान यांचे चाहते ,त्यांचे कुटुंबिय विसरलेले नाहीत. त्यांनी अभिनय केलेले सिनेमे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. इतकेच नाही तर या सिनेमांना अनेक पुरस्कारही मिळत आहेत. अलिकडेच झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान खान यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार इरफान खान यांचा मुलगा बाबिलने स्वीकारला. याव फिल्मफेअरने इरफान खान यांना विशेष पुरस्कार दिला. हा पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर इरफान यांचा मुलगा बाबिल आला. त्यावेळी अभिनेता आयुष्मान खुरानाने इरफानने इरफान यांच्यावर छोटीशी कविताही सादर केली. ही कविता ऐकून बाबिल खूपच वडिलांच्या आठवणीने खूपच हळवा झाला इतका की त्याला स्टेजवरच अश्रू अनावर झाले...ते पाहून या कार्यक्रमाचा होस्ट राजकुमार राव यालाही अश्रू अनावर झाले. भावना अनावर झालेल्या बाबिलला राजकुमारने जवळ घेत घट्ट मिठी मारत त्याचे सांत्वन केले. या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. वडिलांसाठी जाहीर झालेला हा विशेष पुरस्कार घेताना बाबिल म्हणाला, ' मी नेहमीच माझ्या वडिलांची मान ताठ राहिल असेच काम करीन. भारतीय सिनेमाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी माझ्यापरीने सर्वतोपरी प्रयत्न करेन...' यावेळी बाबिलने आपल्या वडिलांच्या काही आठवणींना उजाळा दिला. बाबिलचे मनोगत ऐकताना उपस्थित कलाकारही भावूक झाले होते. बाबिल त्याच्या सोशल मीडियावर अनेकदा आपल्या वडिलांबद्दल काही ना काहीतरी पोस्ट करत त्यांच्या आठवणी शेअर करत असतो. बाबिलने घातला वडिलांचा ड्रेस बाबिलने या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होताना खास त्याच्या वडिलांचा ड्रेस परिधान केला होता. बाबिलने ड्रेस बरोबर घातला आहे की नाही याची पाहणी त्याची आई सुतापा हिने केली. त्याचा व्हिडीओ बाबिलने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी २९ एप्रिलला इरफान खान यांचे कॅन्सरने निधन झाले. इरफान खान यांनी पीकू, पान सिंह तोमर अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mz6DJp