मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेट कर्णधार यांची जोडी तर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. विराट अनुष्काचे चाहते फक्त देशातच नाही तर जगभरात आहेत. पण विराटच्या चाहत्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. विराटनं २०१७ मध्ये अनुष्का शर्माशी लग्न केलं आणि या दोघांना आता एक मुलगी देखील आहे. पण अनुष्काच्या आधीही विराटच्या लव्ह लाइफची बरीच चर्चा झाली होती. सध्या सोशल मीडियावर विराटची एक्स गर्लफ्रेंड हिचा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामुळे विराट पुन्हा एकादा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो २०१२ ते २०१४ या काळातला असल्याचं बोललं जात आहे. विराटचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करून प्रश्न विचारताना दिसत आहेत. जेव्हा विराट भारतीय क्रिकेट संघात आपलं स्थान पक्कं करण्यासाठी मेहनत घेत होता. त्याचवेळी तो ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री इजाबेलसोबत रि रिपोर्टनुसार इजाबेल विराटच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. अनुष्का शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी विराट दोन वर्ष इजाबेलला डेट करत होता. पण त्यांनी हे नातं कधीच जाहीर केलं नव्हतं पण त्यांच्या ब्रेकअपनंतर इजाबेलनं एका मुलाखतीत याचा स्वीकार केला. ती म्हणाली, 'आमचं एकमेकांवर प्रेम होतं. पण नंतर आम्ही एकामेकांच्या संमतीनंच वेगळे झालो.' मूळची बाझीलच्या रोजारियो शहरातील इजाबेल लिटे एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिनं अनेक चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. इजाबेल तिच्या सौंदर्यासाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरही तिचा बराच मोठी चाहता वर्ग आहे. इजाबेलनं बॉलिवूडच्या 'तलाश: द आंसर लाइज विदिन' 'सिक्सटीन', 'पुरानी जीन्स' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच ती 'नरेंद्र', 'मिस्टर मजनूं' आणि 'वर्ल्ड फेमस लव्हर' या दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3unvUbO