Full Width(True/False)

जुन्या फोनला कंटाळलात ? जूनमध्ये लाँच होत आहेत 'हे' जबरदस्त स्मार्टफोन्स

नवी दिल्ली : जूनमध्ये अनेक कंपन्यांचे नवीन भारतात लाँच होत आहेत. तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही दिवस वाट पाहायला हवी. जूनमध्ये कोणते ५ सर्वोत्तम स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत, ते जाणून घेऊया. पुढील महिन्यात भारतात लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये , , , आणि चा समावेश आहे. फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स पाहुयात. OnePlus Nord 2
  • OnePlus Nord 2 स्मार्टफोनवर गेल्या अनेक महिन्यांपासून काम सुरू होते. रिपोर्टनुसार OnePlus Nord 2 जूनमध्ये भारतात लाँच होऊ शकतो. मात्र, लाँचिंगबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
  • सध्या या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र, Nord 2 स्मार्टफोन भारतीय बाजारात OnePlus Nord का अपग्रेड व्हर्जन असेल. ज्याप्रमाणे OnePlus Nord भारतीय बाजारात कमी किंमतीत दमदार टेक्नोलॉजीसोबत लाँच झाला होता, त्याचप्रमाणे OnePlus Nord 2 मध्ये देखील फीचर्स मिळू शकतात. फोनची किंमत जवळपास ३० हजार रुपये असेल.
वाचाः OnePlus Nord CE 5G जून 2021 मध्ये लाँच होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये OnePlus Nord CE 5G चा देखील समावेश आहे. कंपनी पुढील महिन्यात भारतीय बाजारात दोन स्मार्टफोन लाँच करू शकते, ज्यात Nord CE 5G देखील आहे. फोन १० जूनला भारतात लाँच होऊ शकता. हा कंपनीचा भारतातील सर्वात स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे. अद्याप फोनच्या फीचर्सबद्दल माहिती समोर आलेली नाही. Poco M3 Pro
  • जून २०२१ मध्ये लाँच होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये Poco M3 Pro चा समावेश आहे. फोन आंतरराष्ट्रीय बाजारात आधीच लाँच झाला आहे. हा Redmi Note 10 5G स्मार्टफोनचे रिब्रँडेड व्हर्जन असेल. आंतरराष्ट्रीय बाजारात फोनची किंमत जवळपास १६ हजार रुपये आहे. भारतात देखील याच किंमतीत लाँच होण्याची शक्यता आहे. लाँचिंगच्या तारखेबाबत अचूक माहिती देण्यात आलेली नाही.
  • Redmi Note 10 5G मध्ये ६.५ इंचचा IPS LCD डिस्प्ले येतो. फोन अँड्राइड ११ वर आधारित MIUI १२ वर काम करतो. हा फोन MediaTek MT ६८३३ Dimensity ७०० प्रोसेसरसोबत ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मध्ये येतो. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने २५६ जीबीपर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये ४८+२+२ मेगापिक्सलचे असे तीन कॅमेरे आहेत. तर सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनमध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळेल.
वाचाः Samsung Galaxy A22 5G
  • Samsung Galaxy A22 5G देखील जून महिन्यात लाँच होऊ शकतो. लाँचिंगच्या आधीच याचे काही स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. या फोनमध्ये ६.३ इंच फूल एचडी+ डिस्प्ले दिला जाईल.
  • स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity ७०० SoC प्रोसेसर मिळू शकतो व सोबत ५००० mAh बॅटरी मिळेल. फोनच्या ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत १६ हजार रुपये असू शकते.
Samsung Galaxy M32 या स्मार्टफोनमध्ये ६ .५ इंचचा डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. स्टोरेजमध्ये यात ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. फोनमध्ये पॉवरसाठी ६००० एमएएचची बॅटरी मिळेल. फोनची किंमत जवळपास २० हजार रुपये असण्याची शक्यता असून, हा फोन देखील पुढील महिन्यात लाँच होऊ शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SEWCzL