नवी दिल्ली : कंपनी आपला नवीन फोन ला २० मे ला भारतात लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर लाइव्ह झाला असून, तेथून याच्या किंमत व स्पेसिफिकेशनबद्दल माहिती मिळत आहे. याआधी हा फोन इंडोनेशियामध्ये लाँच करण्यात आला आहे. वाचाः Infinix Hot 10S ची किंमत आणि फीचर्स फ्लिपकार्टवरील माहिती नुसार या फोनची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी असेल. फोन क्वाड रियर कॅमेरा सेटअप सोबत येईल, ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर असेल. याच्या अन्य सेंसरची माहिती अद्याप मिळालेली नाही. याशिवाय यात मीडियाटेक Helio G85 प्रोसेसर आणि 90Hz सपोर्ट असणारा डिस्प्ले मिळेल. अन्य फीचर्सबद्दल सांगायचे तर यात ६०००एमएएच बॅटरीसह DTS ऑडिओ आणि Dar-link अल्टिमेट गेम बूस्टर मिळू शकते. हा फोन अँड्राइड ११ ऑपरेटिंग सिस्टमसोबत येऊ शकतो. वाचाः कंपनीने याआधी Infinix Hot 10 Play या स्मार्टफोनला भारतीय बाजारात लाँच केले होते. या फोनची किंमत ८,४९९ रुपये आहे. यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळेल. Infinix Hot 10 Play ला MediaTek Helio G35 octa-core प्रोसेसर सोबत सादर करण्यात आले असून, यात अँड्राइड १० ओएस देण्यात आले आहे. यात ६.८२ इंचचा एचडी+ डिस्प्ले मिळेल, ज्याचे स्क्रीन रिझॉल्यूशन ७२०x१६४० पिक्सल आहे. फोटोग्राफीसाठी Infinix Hot 10 Play मध्ये रियर फ्लॅशशोबत ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी सेंसर १३ मेगापिक्सल आहे आणि एक एआय लेंस यात मिळेल. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल, जो पंच होल कटआउटसोबत येते. पॉवरसाठी यात ६०००एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ol7gHw