Full Width(True/False)

अखेरपर्यंत दोन गोष्टींचूी ऋषी कपूर यांना वाटत होती खंत

मुंबई : बॉलिवूडमधील चॉकलेट हिरो म्हणून ओळखले जाणारे यांचा आज पहिला स्मृतीदिन. ऋषी कपूर भलेही आज आपल्यात नाहीत परंतु सिनेमांच्या रुपाने ते आजही आपल्यात आहेत. ऋषी कपूर यांनी आपल्या '' या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर मोकळेपणाने भाष्य केले आहे. त्यातील काही ठळक गोष्टी जाणून घेऊयात... ऋषी यांच्या दोन इच्छा अपु-या राहिल्या ऋषी कपूर यांनी पाच दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य केले. मात्र इतके वर्षे काम केल्यानंतरही त्यांना एका गोष्टीची कायम खंत होती, ती म्हणजे सिनेमासाठी सक्रीय योगदान देऊनही त्यांची दखल सरकार दरबारी घेतली गेली नाही, म्हणूनच त्यांना 'पद्मश्री' पुरस्कारापासून लांब रहावे लागले. या गोष्टीबरोबरच आणखी एका गोष्टीची त्यांना शेवटपर्यंत खंत होती ती म्हणजे आपल्या मुलाचे रणबीर कपूर याचे लग्न ते पाहू शकले नाहीत. ऋषी कपूर यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये असे ही लिहिले आहे की, रणबीर त्यांच्याशी कधीच मोकळेपणाने बोलला नाही, जेवढा तो त्याच्या आईशी मोकळेपणाने बोलायचा. ऋषी कंजूष होते... ऋषी कपूर हे कंजूष होते असे अनेकांचे मत होते. याबद्दल त्यांची पत्नी नीतू कपूर यांनीही एक अनुभव सांगितला. त्यांनी सांगितले, 'ते न्यूयॉर्कला असताना अपार्टमेंटमध्ये परत येत असताना सकाळच्या चहासाठी दुधाची बाटली मला घ्यायची होती. मी वाटेत असलेल्या दुकानातून घेत होते. अर्धी रात्र उलटलेली असूनही चिंटूने अपार्टमेंटपासून दूर असलेल्या एका दुकानात जाऊन दूध आणले, कारण त्या दुकानात दुधाची बाटली ३० सेंटनी स्वस्त मिळत होती.' रविवार हा सुट्टीचाच दिवस अनेकदा सेलिब्रिटींना रविवारीही चित्रीकरण करावे लागते, त्यामुळे त्यांच्यासाठी सुट्टी कोणत्या विशिष्ट दिवशी नसते. परंतु ऋषी कपूर यांनी कधीही रविवारी सिनेमाचे चित्रीकरण केले नाही. त्यांचा रविवार हा फक्त आणि फक्त कुटुंबासाठी असायचा. अॅवॉर्ड विकत घेतले होते ऋषी कपूर यांनी अभिनेता म्हणून १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बॉबी' सिनेमापासून केली. अर्थात याआधी त्यांनी 'श्री ४२०' आणि 'मेरा नाम जोकर' या सिनेमांमधून बालकलाकार म्हणून काम केले होते. ऋषी कपूर यांनी आपल्या पहिल्याच सिनेमासाठी सर्वोत्तम अभिनेता म्हणून पारितोषिक मिळवले होते. अर्थात त्यावेळी अमिताभ यांना पुरस्कार 'जंजिर'साठी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. या घटनेबाबत ऋषी कपूर यांनी आपल्या 'खुल्लमखुल्ला' या आत्मचरित्रामध्ये म्हटले आहे की, 'मला याबद्दल नक्कीच लाज वाटते की मी ते अवॉर्ड विकत घेतले होते. एका पीआरने मला सांगितले की सर मला ३० हजार रुपये द्या, मी ते अवॉर्ड तुम्हाला मिळवून देतो. ' त्यानंतर ऋषी कपूर यांनी कोणताही विचार न करता त्याला पैसे दिले, या गोष्टीबद्दल त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये खंत व्यक्त केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aP4ftm