Full Width(True/False)

Twitter चा वापर फ्री मध्ये करता येणार नाही ' या' सर्व्हिससाठी मोजावे लागणार २०० रुपये महिना

नवी दिल्ली. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटर विनामूल्य वापरली जाते. ट्विटर लवकरच ट्विटर ब्लू ही नवीन सेवा सुरू करणार आहे. ही सशुल्क सदस्यता आधारित सेवा असेल, ज्यासाठी युजर्संना दरमहा $ २.९९ शुल्क द्यावे लागेल. काही काळापूर्वी ट्विटरने सशुल्क सदस्यता मॉडेल सादर करण्याचे सांगितले होते. शनिवारी App संशोधक जेन मंचन वोंग यांनी ट्विटर ब्लू नावाच्या ट्विटरचे पेड सबस्क्रिप्शन मॉडेल सादर केले. यात बुकमार्क संग्रह वैशिष्ट्य देखील जाहीर केले. जर भारताबद्दल बोलायचे झाल्यास ते दरमहा २०० रुपयांच्या शुल्कासह लाँच केले जाऊ शकते. तर , ट्विटर ब्लू प्रथम अमेरिकेत लाँच केले जाईल आणि नंतर इतर देशांमध्ये सुरू करण्याच्या तयारीत ट्विटर आहे. वाचा : ट्विटर ब्लूमध्ये काय असेल विशेष द व्हर्जच्या वृत्तानुसार, ट्विटर ब्लू अनेक वैशिष्ट्यांचा संग्रह आहे. ही वैशिष्ट्ये ट्विटरच्या विनामूल्य आवृत्तीमध्ये उपलब्ध होणार नाहीत. त्या ट्विटला एडिट करण्याचा पर्यायही असेल, ज्याची मागणी बर्‍याच काळापासून केली जात होती. म्हणजे युजर्सना कोणतेही ट्विट पब्लिश झाल्यानंतर ५ ते ३० सेकंदात ते डिलीट करण्याचा पर्याय असेल. तसेच ट्विटर ब्लू फीचरमध्ये ट्विटरमध्ये ट्विट सेव्ह करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याच्या मदतीने युजर्सना ते नंतर शोधता येतील.थोडक्यात सांगायचे तर ट्विटर आपल्याला आपले ट्विट Collect करण्याचा पर्याय देईल. मिळणार या सेवांचा लाभ ट्विटर इतर अनेक वैशिष्ट्यांवर काम करत आहे. त्याअंतर्गत फोटो क्रॉप करणे अधिक सोपे केले जाईल. तसेच फोटोला डिस्प्ले व्ह्यू पर्यायही दिला जाऊ शकतो. तसेच कन्टेन्ट क्रिएटर्स, पत्रकार, तज्ञ, ना-नफा संस्था यांना देणगीची सुविधा देखील उपलब्ध असेल. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tTWtVO