Full Width(True/False)

‘या’ दमदार फोनवर ३ हजारांची सूट, १० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा स्मार्टफोन

नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी पोकोचा सर्वात लोकप्रिय बजेट स्मार्टफोन पोको एम3 ला पहिल्यांदाच कमी किंमतीत खरेदी करण्याची चांगली संधी ग्राहकांकडे आहे. 6000 एमएएच बॅटरी आणि 48 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसोबत येणारा हा स्मार्टफोन डिस्काउंटसह मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. या फोनच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया. वाचाः स्पेसिफिकेशन्स पोको एम3 मध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर देण्यात आले आहे. या फोनमध्ये 6.53 इंच फुल एचडी+ (1080x2340 पिक्सल) डिस्प्ले आहे, आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. तसेच, प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आली आहे. वाचाः फोनमध्ये 3 रियर कॅमेरे देण्यात आले असून, यात 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा सेंसरचा समावेश आहे. सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. स्टोरेजबद्दल सांगायचे तर 6जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजे व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी टॉप व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. यात 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000 एमएएचची दमदार बॅटरी देखील मिळेल. वाचाः Poco M3 फ्लिपकार्ट ऑफर 2 मे पासून ग्राहकांसाठी Flipkart Big Saving Days सुरू होणार आहे. पोको एम3 ची मूळ किंमत 12,999 रुपये आहे. मात्र कमी किंमत व 1000 रुपये डिस्काउंटसह फोन 9,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. अशाप्रकारे फोन एकूण 3 हजार रुपये कमी किंमतीत खरेदी करण्याची ग्राहकांना संधी आहे. वाचाः सॅमसंग Galaxy A22 सॅमसंग Galaxy A22 या स्मार्टफोनचे अनेक फीचर्स याआधी लीक झाले आहेत. हा स्मार्टफोन देखील या महिन्यात लाँच होणार आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 6GB रॅम, ट्रिपल रियर कॅमेरा, व्ही-शेप्ड नॉच, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 5G सपोर्टसह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nCPtuW