Full Width(True/False)

कंगना रणौतचं वेब दुनियेत पदार्पण, निर्माती म्हणून करणार राज्य

मुंबई : अभिनेत्री आता डिजिटल विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अर्थात या क्षेत्रात ती अभिनेत्री म्हणून नाही तर निर्माती म्हणून पदार्पण करत आहे. कंगनाने 'मणिकर्णिका फिल्म्स' ची स्थापना केली असून संस्थेचा लोगो शेअर केला आहे. या निर्मिती संस्थेतर्फे 'टिकू वेडस् शेरू' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. कंगनाने एक ट्वीट करत लोगो लॉन्च केला आहे. त्याबरोबरच तिने लिहिले आहे की 'टिकू वेडस् शेरू' या लव्ह स्टोरीतून आम्ही डिजीटल विश्वात पदार्पण करत आहोत. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे.' कंगना पुढे म्हणाली की, 'ती आपल्या निर्मिती संस्थेतर्फे नवीन कलाकारांना संधी देणार आहे आणि नवीन संकल्पनांना वाव देणार आहे. ' तिने यावेळी असेही सांगितले की, 'डिजीटल प्रेक्षकांची अभिरुची सिनेमा बघणाऱ्या प्रेक्षकांपेक्षा खूप वेगळी आणि अधिक प्रगत आहे. त्यामुळे त्यांना वेगळ्या प्रकारच्या गोष्टी दाखवायला हव्यात.' अर्थात हे सांगताना कंगनाने आपल्या आगामी सिनेमाची अधिक माहिती दिलेली नाही. दरम्यान, कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिच्याकडे अनेक सिनेमे आहेत. 'थलायवा' हा तिचा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. हा सिनेमा तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारीत आहे. खरे तर या महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार होता परंतु करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या सिनेमाचे रिलीज पुढे गेले आहे. त्याशिवाय तिच्याकडे 'धाकड', 'तेजस' हेही सिनेमे आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vxQlDZ