Full Width(True/False)

फोन खरेदी करण्याचा विचार आहे? मे महिन्यात लाँच होणार हे ५ दमदार स्मार्टफोन

नवी दिल्लीः या महिन्यात जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ओप्पो पासून ते अ‍ॅपलपर्यंत अनेक ब्रँडचा पर्याय तुमच्यासमोर आहे. ओप्पो या महिन्यात आपला 5जी स्मार्टफोन ओप्पो के9 ला लाँच करण्याच्या तयारीत आहे. गुगल, अ‍ॅपल, सॅमसंग आणि पोको देखील आपले फोन लाँच करणार आहेत. पाहूयात हे फोन कोणते आहेत. वाचाः Oppo K9 5G हा स्मार्टफोन 6 मे ला भारतीय बाजारात दाखल होणार आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 768जी प्रोसेसर, 64 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप, 6.43 इंचचा डिस्प्ले, OLED पॅनल, 90hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह अनेक फीचर्स यात मिळतील. ओप्पो या फोनला 8GB/128GB आणि 8GB/256GB अशा दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. वाचाः सॅमसंग Galaxy A22 सॅमसंग Galaxy A22 या स्मार्टफोनचे अनेक फीचर्स याआधी लीक झाले आहेत. हा स्मार्टफोन देखील या महिन्यात लाँच होणार आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 6GB रॅम, ट्रिपल रियर कॅमेरा, व्ही-शेप्ड नॉच, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 5G सपोर्टसह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. वाचाः Poco F3 GT हा स्मार्टफोन देखील याच महिन्यात लाँच होणार आहे. चीनमध्ये नुकताच लाँच झालेल्या Redmi K40 Game Enhanced Edition चे हे री-ब्रँडेड व्हर्जन असेल, असेही सांगितले जात आहे. फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर यात MediaTek Dimensity 1200 प्रोसेसर, 12GB रॅम, 6.67 इंच का फूल HD+ डिस्प्ले, 64 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा, 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,065mAh बॅटरी देण्यात आली आहे. वाचाः गुगल पिक्सल 5a हा स्मार्टफोन 20 मे पर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. गुगल आपल्या I/O event मध्ये हा फोन लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर, 6.2 इंचचा FHD+ OLED डिस्प्ले विद 90Hz रिफ्रेश रेट, 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमरा आणि 20W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 3840mAh बॅटरी देण्यात आली आहे. वाचाः IPhone SE 3 किंवा iPhone SE 2022 आयफोन एसई 2020 ला कंपनीने मागील वर्षी सादर केले होते. कंपनी यावर्षी IPhone SE 3 ला लाँच करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत IPhone SE 3 किंवा iPhone SE 2022 बाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. हा अफोर्डेबल फोन असण्याची शक्यता आहे. अपकमिंग आयफोनमध्ये 4.7 इंच डिस्पले, आयफोन 12 सीरिजमध्ये वापरण्यात येणाऱ्या A141 बायोनिक चिपसेट, LCD पॅनल, 12 मेगापिक्सल+ 12 मेगापिक्सल रियर कॅमरा सेटअप आणि 3GB रॅमसह अनेक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xG5jcU