मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री वयाच्या ४७ व्या वर्षीही तिचा फिटनेस आणि घटस्फोटानंतर अर्जुन कपूरसोबतचं नातं या गोष्टींमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरते. पण आता पुन्हा एकादा आई होण्याची इच्छा बोलून दाखवल्यानं मलायकाच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. ४७ वर्षीय मलायकाला अरबाज खानपासून अरहान खान हा १९ वर्षांचा मुलगा आहे. असं असताना मलायकानं पुन्हा एकदा आई होण्याची इच्छा बोलून दाखवल्यानं सर्वच अवाक झाले आहेत. मलायका अरोरा सध्या रिऍलिटी शो '' मध्ये परिक्षक म्हणून आहे. याच शोमध्ये तिनं आई होण्याची इच्छा बोलून दाखवली. काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टीला रिप्लेस करून 'सुपर डान्सर चॅप्टर ४' मध्ये परिक्षक म्हणून आलेली मलायका या शोमधून लहान मुलींना पाहून खूपच इम्प्रेस झाली. या शोमधील स्पर्धक अंशिका राजपूत चा डान्स पाहून मलायकानं आपल्याला पुन्हा एकादा आई होण्याची असल्याचा खुलासा केला. 'सुपर डान्सर चॅप्टर ४' मध्ये अंशिकाचं कौतुक करताना मलायका म्हणाली, 'मला पुन्हा एकदा आई व्हायचंय, मी खूप गंभीरपणे हा विचार केला आहे. पण मला यावेळी एक मुलगी हवीये. कारण माझ्या आजूबाजूला सर्व पुरुषच आहे. मी एका मुलाची आई आहे पण मला एक मुलगी सुद्धा हवी आहे, जिच्यासोबत मी माझा मेकअप, ड्रेस, शूज या सर्व गोष्टी शेअर करू शकेन.' 'सुपर डान्सर चॅप्टर ४'ची दुसरी परिक्षक गीता कपूरनं मलायकाची ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. मलायकाचं बोलणं एकून गीता खूपच भावुक झाली होती. तिनं मलायकाला लवकरच एक मुलगी होऊ दे असं म्हणत शुभेच्छा दिल्या. यावर मलायका म्हणली, 'गीता तुमच्या तोंडात साखर पडो. मला मुलगी होऊ दे किंवा मी मुलगी अॅडॉप्ट करेन. माझी ही खूप मनापासून इच्छा आहे.' दरम्यान मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. हे दोघं लग्न कधी करणार याची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होताना दिसते. पण यासोबतच या दोघांच्या वयातील फरकामुळे त्यांना ट्रोलही केलं जातं. मलायका आणि अर्जुन यांच्या वयात ११ वर्षांचा फरक आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fexR6b