Full Width(True/False)

'मदर्स डे' ला करिना कपूरने शेअर केला दोन्ही मुलांचा क्युट फोटो

मुंबई- आज जगभरात '' मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण आईसाठीचं प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त करत आहेत. आजच्या दिवसाचं औचित्य साधून बॉलिवूड अभिनेत्री ने आपल्या दुसऱ्या मुलाचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. करिनाने 'मदर्स डे' च्या दिवशी दोन्ही मुलांचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यात करिना आणि सैफ अली खानचा लाडका छोट्या भावाला मांडीवर घेऊन बसलेला दिसत आहे. करिनाने मदर्स डे निमित्त शेअर केलेल्या फोटोत तैमूर त्याच्या लहान भावासोबत दिसतोय. तैमूरने त्याच्या भावाला मांडीवर घेतलं आहे तर छोट्या मुलाने त्याचे दोन्ही हात गालाजवळ घेतल्याने त्याचा चेहरा झाकला गेलाय. या फोटोसोबत करिनाने कॅप्शन देत आजच्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करिनाने लिहिलं, 'आशेवर सगळं जग अवलंबून आहे आणि माझ्या दोन्ही मुलांमध्ये मला चांगल्या भविष्याची आशा दिसते. तुम्हा सगळ्या सुंदर आणि मजबूत आईंना मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आशेचा किरण सतत आपल्यासोबत ठेवा.' करिनाने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. या फोटोला काही तासातच ३ लाखाहून अधिक लाइक मिळाले आहेत. करिनाने फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. मुलाच्या जन्मानंतर तिने जाणीवपूर्वक आपल्या बाळाला प्रसार माध्यमांपासून दूर ठेवलं होतं. याचमुळे चाहते त्याच्या नावाची, त्याला पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, करिना अभिनेता आमिर खानसोबत 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतमसोबत 'भूत पुलिस' चित्रपटातही दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hdtQk0