Full Width(True/False)

करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी विराट- अनुष्काने जमवले कोट्यवधी

मुंबई- देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. सगळीकडेच चिंतेचं वातावरण आहे. रुग्णांना बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासतेय. अशा परिस्थितीत अनेक बॉलिवूड कलाकार करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार यांनीही करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. किटो या संस्थेच्या मदतीने विराट आणि अनुष्काने एक अभियान सुरू केलं होतं. त्यांच्या या अभियानाअंतर्गत त्यांनी जवळपास ३ कोटी ६० लाख रुपये जमा केले आहेत. अनुष्का आणि विराटने किटो या संस्थेमार्फत नागरिकांना करोनाग्रस्तांसाठी शक्य तितकी मदत करण्याचं आवाहन केलं होतं. हे पैसे करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी वापरले जाणार आहेत. विराट आणि अनुष्का यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील कित्येक नागरिकांनी किटोमध्ये देणगी दिली. त्यामुळे फक्त २४ तासात विराट- अनुष्काने ३ कोटी ६० लाख रुपये जमा केले आहेत. विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत लिहिलं, '२४ तासांपेक्षाही कमी वेळात ३ कोटी ६० लाख रुपये. तुमच्या प्रतिसादाबद्दल मी खूप आनंदी आहे. आमचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा आणि देशाची मदत करत राहा. धन्यवाद.' अनुष्कानेही तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत सगळ्यांचे आभार मानले आणि लिहिलं, 'मी तुम्हा सगळ्यांची आभारी आहे ज्यांनी आतापर्यंत मदत केली आहे. तुमच्या मदतीसाठी धन्यवाद. आपण अर्धा रस्ता पार केला आहे. पुढे चालत राहूया.' विराट आणि अनुष्काने या अभियानात २ कोटींची मदत देणार असल्याची घोषणा केली आहे. विराट आणि अनुष्काचं हे अभियान जवळपास सात दिवस सुरू राहणार आहे. जमा झालेल्या पैशातून करोनाग्रस्तांसाठी ऑक्सिजन, लसीकरण आणि इतरही काही सुविधा पुरवल्या जाणार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33thhJi