नवी दिल्ली : पाठवण्यासाठी गुगलच्या सेवाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. खासगी कामापासून ते ऑफिसच्या कामापर्यंत अशा अनेक गोष्टींसाठी उपयोगी ठरते. १ जून पासून मोफत अनलिमिटेड स्पेस सेवा बंद करणार आहे. अशात जर ईमेलमध्ये बिनकामाचे मेल्स असतील तर तुम्ही ते डिलीट करून जागा रिकामी करू शकता. फ्री स्पेस वाचवण्यासाठी तुम्ही असे बिनकामाचे मेल्स डिलीट करून, स्वतःसाठी अधिक स्पेस ठेवू शकता. वाचाः गुगल एका अकाउंटवर १५ जीबी मोफत स्टोरेज देत आहे. या मोफत स्टोरेजमध्ये गुगलच्या सर्व सेवा जसे की Gmail, , इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे कमीत कमी स्टोरेज कसे वापरता येईल, ते पाहिले पाहिजे. जीमेलमध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी करा हे – स्टोरेज वाढवण्यासाठी सर्वात प्रथम फोन अथवा लॅपटॉपमध्ये Gmail उघडा. यानंतर येथे सर्च बारमध्ये “has:attachment larger:10M” टाइप करा. हे सर्च केल्यावर १० एमबी पेक्षा अधिक असलेले ईमेल तुम्हाला दिसेल. तुम्हाला यापेक्षा मोठ्या साइजचा ईमेल डिलीट करायचा असेल तर १० एमबीच्या जागी दुसरा आकडा टाका. वाचाः सर्च केल्यानंतर तुम्हाला १० MB पेक्षा मोठे असलेले ईमेल्स दिसतील. या सर्व मेल्सला सिलेक्ट करून तुम्ही डिलीट करू शकता. यानंतर तुम्हाला ट्रॅश सेक्शनमध्ये जाऊन एम्प्टी ट्रॅश बटनावर क्लिक करावे लागेल. यामुळे तुमचे विनाकामाचे ईमेल्स डिलीट होऊन स्टोरेज वाढेल. जर तुम्हाला प्रमोशनल अथवा इतर फालत मेल्स नको असतील तर तुम्ही अशा ईमेल्सला अनसब्सक्राइब करू शकता. अधिक स्पेससाठी तुम्ही जुने ईमेल्स देखील डिलीट करू शकता. जर तुम्ही एखाद्या वेबसाइटवर न्यूजलेटर अथवा प्रमोशन्सला साइन अप केले असेल तर तुम्हाला ईमेलच्या खाली येणाऱ्या अनसब्सक्राइब लिंकवर क्लिक करावे लागेल, यामुळे असे मेल्स येणे बंद होतील. अशाप्रकारे तुम्ही गुगलच्या मोफत स्टोरेजचा फायदा घेऊ शकता. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vHgTmM