न्यूयॉर्क- नव्वदच्या दशकात ही व्यक्तीरेखा साकारून प्रसिद्ध झालेला अभिनेता विल्यम उर्फ यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले. त्यांचे विमान नैशविल (Nashville) जवळील पर्सी प्रिस्ट लेकमध्ये कोसळले. ५८ वर्षीय जो त्यांची पत्नी ग्वेन लारा आणि इतर पाचजणांसह जेट विमानातून प्रवास करत होते. घटनेसंबंधी माहिती मिळताच अग्निशमन दलाची टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पाश्चिमात्य मीडियाच्या वृत्तानुसार, पोलीस जोसेफ लारासह इतर सहा जणांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. हा विमान अपघात इतका भयानक होता की यातून कोणीही जिवंत राहण्याची शक्यता दिसत नाही. रविवारी रदरफोर्ड काउंटी फायर रेस्क्यूच्या कॅप्टननेही याबाबत निवेदन दिले. आपल्या निवेदनात ते म्हणाले की, 'स्मिर्ना (Smyrna) जवळील तलावामध्ये शोध आणि बचावकार्य सुरू आहे.' या विमानातून प्रवास करणाऱ्या सातजणांची ओळख ब्रॅंडन हॅना, ग्वेन एस लारा, विल्यम जोसेफ लारा, डेव्हिड एल मार्टिन, जेनिफर जे. मार्टिन, जेसिका वॉल्टर्स आणि जोनाथन वॉल्टर्स अशी सांगण्यात आली आहे. ते सर्व टेनेसी येथील ब्रेंटवुड येथील राहणारे होते. कुटुंबातील सदस्यांकडून पुष्टी मिळाल्यानंतरच त्यांची नावे जाहीर केली गेली आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fAwqzf