मुंबई: लोकप्रिय अमेरिकन सिटकॉम सीरिज फ्रेंड्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता 'फ्रेंड्स: द रीयूनियन' लवकरच भारतातही रिलीज होणार आहे. मागच्या बऱ्याच काळापासून यासीरिजची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे ही सीरिज कधी, कुठे आणि कशी पाहता येणार याबाबत प्रेक्षकांमध्ये अनेक शंका होत्या. त्या आता दूर झाल्या असून या सीरिजबद्दल सर्वा माहिती समोर आली आहे. 'फ्रेंड्स: द रीयूनियन' ही सीरिज भारतात या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. येत्या २७ मे दिवशी 'फ्रेंड्स: द रीयूनियन'चा प्रीमियर झी ५ वर होणार आहे. त्यामुळे ही सीरिज कोणत्याही लिंकवरून डाऊनलोड करण्याची गरज नाही. झी ५ या अॅपवरून 'फ्रेंड्स: द रीयूनियन'चे चाहते त्यांची आवडती सीरिज आता पाहू शकणार आहेत. दरम्यान ९० च्या दशकात 'फ्रेंड्स' ही टीव्ही सीरिज प्रचंड लोकप्रिय ठरली होती. २२ सप्टेंबर १९९४ मध्ये या सीरिजचा पहिला प्रीमियर झाला होता. त्यानंतर या सीरिजचे १० सीझन आले. २००४ मध्ये या सीरिजचा शेवटचा एपिसोड प्रसारित झाला. ज्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता 'फ्रेंड्स: द रीयूनियन' पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'फ्रेंड्स: द रीयूनियन'मधून जेनिफर एनिस्टन, कोर्टनी कॉक्स, लिसा कुड्रो, मॅट लीब्लँक, मॅथ्यू पेरी आणि डेविड श्विमर हे कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'फ्रेंड्स: द रीयूनियन' झी ५ वर पाहण्यासाठी प्रेक्षकांना ४९९ रुपयांचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागणार आहे. येत्या २७ मेपासून प्रेक्षक ही सीरिज घरबसल्या पाहू शकतील. 'फ्रेंड्स: द रीयूनियन'मध्ये डेविड बेकहम, जस्टिन बीबर, बीटीएस, जेम्स कोर्डन, सिंडी क्रॉफोर्ड आणि लेडी गागा हे पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34ffoQB