मुंबई: काही दिवसांपूर्वीच 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील बबीताजी म्हणजे अभिनेत्री मुनमुन दत्ताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मुनमुन दत्तानं तिच्या व्हिडीओमध्ये जातिवाचक शब्दाचा वापर केल्यानं सोशल मीडियावरून तिच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर आता अभिनेत्री युविका चौधरीलाही याच कारणासाठी अटक करण्याची मागणी सोशल मीडियावर होताना दिसत आहे. तसेच तिचा वादग्रस्त व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ओम शांति ओम फेम अभिनेत्री युविका चौधरीनं सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिनं जातीवाचक शब्द वापरला आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला अटक केली जावी अशी मागणी होताना दिसत आहे. युविकानं तिच्या सोशल मीडियावर एक व्लोग शेअर केला आहे. ज्यात तिचा पती प्रिन्स नरुला हेअर कट करताना दिसत आहे आणि युविका व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. व्हिडीओ शूट करताना युविका म्हणते, 'जेव्हाही मी व्लोग शूट करत असते तेव्हा मी नेहमीच **** सारखी येऊन उभी राहते. मला वेळचं मिळतं नाही की मी स्वत: ला व्यवस्थित दाखवू शकेन. मी वाईट दिसतेय आणि प्रिन्स मला तयार होण्यासाठी वेळही देत नाही.' युविकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरल #ArrestYuvikaChoudhary ट्रेंड होताना दिसत आहे. दरम्यान युविकानं तिच्या इन्स्टाग्रामवर याबाबतचं स्पष्टीकरण देत एक पोस्ट केली आहे. ज्यात तिनं म्हटलंय, 'मी माझ्या नव्या व्लॉगमध्ये जो शब्द वापरला त्याचा अर्थ मला माहीत नव्हता. कोणाच्याही भावना जाणूनबुजून दुखावण्याचा माझा हेतू अजिबात नव्हता. माझ्याकडून अनावधाननं घडलेल्या चुकीबद्दल मी माफी मागते. तुम्ही मला समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.' काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मुनमुन दत्ताने जातीवाचक शब्दांचा उल्लेख केल्याने तिला नेटकऱ्यांच्या संतापाला समोरं जावं लागलं होतं. तसेच देशात अनेक ठिकाणी मुनमुन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता युविकाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी तिच्यावर टीका करत तिला अटक करणं गरजेचं आहे जेणेकरून यांच्यासारखे लोक सुधरतील असं म्हटलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QQ2CFh