Full Width(True/False)

बंपर ऑफर! Infinix Smart 4 Plus, Hot 10S बजेट फोन्सवर मिळत आहे मोठी सूट

नवी दिल्ली : ला मिंड-रेंज आणि बजेट डिव्हाइस बनवण्यासाठी ओळखले जाते. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर Shop From Home Sale 2021 सुरू आहे. या सेलमध्ये इनफिनिक्सच्या लोकप्रिय मिड-रेंड आणि बजेट डिव्हाइसवर मोठी सूट मिळत आहे. सेलमध्ये बजेट फोन , सह अनेक फोन्सवर सूट मिळत असून, हा सेल २९ पर्यंत सुरू राहणार आहे. वाचाः Infinix Zero 8i: १४,४९९ रुपये इनफिनिक्स झिरो 8i स्मार्टफोनला २,५०० रुपये प्रति महिन्याच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल. फोनला कार्डद्वारे खरेदी केल्यास १० टक्के सूट मिळेल. अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसोबत ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक देखील मिळेल. या फोनमध्ये ४५०० एमएएचची बॅटरी आणि ६.८५ इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. Infinix Smart 4 Plus: ७,४९९ रुपये इनफिनिक्स स्मार्ट 4 प्लस स्मार्टफोवर देखील मोठी सूट मिळत आहे. या हँडसेटला एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर ईएमआयवर १० टक्के सूटसह खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक देखील मिळेल. फोनवर १,२५० रुपये नो-कॉस्ट ईएमआय ऑफर दिली जात आहे. यावर ६,४९९ रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. वाचाः Infinix Hot 10: १०,४९९ रुपये इनफिनिक्स हॉट 10 स्मार्टफोनला फ्लिपकार्टवरून १,७५० रुपये प्रति महिन्यावर नो-कोस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास फोनवर १० टक्के आणि डेबिट व क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रांझॅक्शनद्वारे फोनवर १००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. फ्लिपकार्ट एक्सिस बँक क्रेडिट कार्डसोबत ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅकची ऑफर दिली जाईल. फोनवर ९,८५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील आहे. Infinix Smart HD 2021: ६,४९९ रुपये या फोनला एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रांझॅक्शनवर खरेदी केल्यास १० टक्क्यांपर्यंत (१००० रुपये) सूट मिळेल. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँके क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. फोनला १,४१७ प्रति महिना नो कोस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल. Infinix Hot 10S: ९,४९९ रुपये इनफिनिक्स हॉट 10एस स्मार्टफोन ९,४९९ रुपयात फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. फोनला बँक ऑफ बडोदाच्या मास्टर डेबिट कार्डवरून पहिल्यांदा खरेदी केल्यास १० टक्के सूट मिळेल. फोनला १,८३४ रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल. फोनमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट असणारा डिस्प्ले मिळेल. यात ४८ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि मीडियाटे हिलियो जी८५ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनवर १०,४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hY7KSM