नवी दिल्ली : ने फ्लिपकार्टसोबत मिळून स्मार्ट टीव्हीची नवीन रेंज भारतात लाँच केली आहे. या रेंजची सुरुवाती किंमत २९,९९९ रुपये आहे. टीसीएलचे नवीन स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने ३ नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केले असून, यात पहिली P715 4K UHD AI रेंज आहे. टीसीएलचे हे टीव्ही डायनामिक कलर इन्हँसमेंट आणि 4K अपस्केलिंगसोबत येतात. ही टीव्ही रेंज हँड-फ्री वॉइस कंट्रोल, AI-इंटिग्रेटेड सिस्टम, गूगल प्ले सर्व्हिसेजसह येते. यात ऑडिओसाठी इंटिग्रेटेड बॉक्स स्पीकरसोबत डॉल्बी ऑडिओ देण्यात आला आहे, जो MP3, WMA आणि AC4 फॉर्मेट्सला सपोर्ट करतो. वाचाः टीव्हीची किंमत टीसीएलच्या P715 4K UHD AI टीव्ही रेंज ३ व्हेरिएंट्समध्ये येतात. ४३ इंच व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये, ५० इंच व्हेरिएंटची किंमत ३८,९९९ रुपये आणि ६५ इंच व्हेरिएंटची किंमत ६४,९९९ रुपये आहे. कंपनीकडून लाँच करण्यात आलेला दुसरे स्मार्ट टीव्ही मॉडेल C715 4K QLED TV आहे. हा टीव्ही बिल्ट-इन गूगल असिस्टेंट, क्रोमकास्ट आणि हँड्स-फ्री वॉइस कंट्रोलसोबत येतो. तसेच, यात रेंज क्वॉन्टम डॉट टेक्नोलॉजी, डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि IPQ इंजिन मिळते. ही स्मार्ट टीव्ही रेंज देखील ३ व्हेरिएंट्समध्ये येते. याच्या ५० इंच मॉडेलची किंमत ४९,९९९ रुपये, ५५ इंच व्हेरिएंटची किंमत ५६,९९९ आणि ६५ इंच व्हेरिएट्सची किंमत ८८,४९९ रुपये आहे. वाचाः १.२९ लाख रुपयांपर्यंतचे टीव्ही टीसीएलने C815 4K QLED TV मॉडेल्स सादर केले आहे. हे अँड्रॉयड टीव्ही हँड्स-फ्री वॉइस कंट्रोल, क्वॉन्टम डॉट टेक्नोलॉजी, डॉल्बी विजन आणि HDR10+ सोबत येतात. यात मोशन एस्टिमेशन मोशन काम्पन्सॅशन (MEMC) टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. टीसीएलच्या टीव्हीसोबत इंटीग्रेटेड Onkyo साउंडबार्ससोबत येतात. या टेलिव्हिजन रेंजच्या ५५ इंच मॉडेलची किंमत ७८,४९९ रुपये, ६५ इंच मॉडेलची किंमत १,१४,९९९ रुपये आणि ७५ इंच व्हेरिएंटची किंमत १,२९,९९९ रुपये आहे. वाचाः वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34kfgiI