नवी दिल्लीः टेक्नोने अखेर आज भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन Tecno Spark 7 लाँच केला आहे. Tecno Spark 7 एक बजेट स्मार्टफोन असून देशात या फोनला १० हजार रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा AI ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, तसेच ६.६ इंचाची मोठी स्क्रीन सारखे जबरदस्त फीचर्स दिले आहेत. फोन मागील टेक्नो स्पार्क ७ चे अपग्रेड व्हेरियंट आहे. जाणून घ्या टेक्नो स्पार्क ७ प्रो ची किंमत, फीचर्स आणि सर्वकाही. वाचाः ची किंमत टेक्नो स्पार्क प्रोच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. फोनची विक्री २८ मे दुपारी १२ वाजेपासून अॅमेझॉन इंडियावर सुरू केली जाणार आहे. वाचाः Tecno Spark 7 Pro चे फीचर्स Tecno Spark 7 Pro मध्ये ६.६ इंचाचा आयपीएस डॉट इन डिस्प्ले दिला आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज, स्क्रीन टू बॉडी रेशियो ८९.५ टक्के आणि पिक्सल डेनसिटी २६८ पीपीआय आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८० प्रोसेसर दिले आहे. स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६ जीबी रॅम सोबत ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय दिला आहे. टेक्नोच्या या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी एआय कॅमेरा दिला आहे. वाचाः सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी एआय कॅमेरा दिला आहे. कॅमेरा सुपर नाइट मोड, नाइट पोर्ट्रेट, स्माइल स्नॅपशॉट सारखे मोड सपोर्ट दिले आहे. टेक्नोच्या या फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोन अँड्रॉयड बेस्ड HiOS 7.5 वर काम करतो. फोनच्या कनेक्टिविटीसाठी वाय फाय, ब्लूटूथ, जीपीएस, ए-जीपीएस आणि ३.५ एमएम ऑडियो जॅक सारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QR0vkw