Full Width(True/False)

२ वर्ष वॉरंटीसह लाँच झाला ‘हा’ स्मार्टफोन, किंमत ८ हजारापासून सुरू

नवी दिल्ली : कूलपॅडने आपल्या बहुप्रतिक्षित बजेट स्मार्टफोनवरील पडदा हटवला आहे. कंपनीने स्मार्टफोनला चीनमध्ये लाँच केले असून, हा फोन १५ हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये येतो. हा फोन गेमिंग-सेंट्रिक प्रोसेसर, एचडी+ डिस्प्ले आणि मोठ्या बॅटरीसोबत येतो. या फोनच्या किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊया. वाचाः Coolpad Cool 20: किंमत आणि उपलब्धता च्या ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६९९ युआन (जवळपास ८ हजार रुपये), ४ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८९९ युआन (जवळपास १० हजार रुपये) आहे. तर ६ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज १,०९९ युआन (जवळपास १२,५०० रुपये) मध्ये उपलब्ध आहे. हा फोन ब्लॅक, सीक्रेट सी ब्लू आणि व्हाइट रंगात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनवर कंपनी २ वर्षांची वॉरंटी आणि ९० दिवसांची रिप्लेसमेंट गँरेंटी देत आहे. चीनमध्ये हँडसेटची विक्री १ जूनपासून सुरू होईल. वाचाः Coolpad Cool 20: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स Cool 20 मध्ये ६.५२ इंच एलसीडी डिस्प्ले आणि टियरड्रॉप नॉच देण्यात आला आहे, ज्याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशिया २०:९, रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आणि पिक्सल डेनसिटी २६९ पीपीआय आहे. स्मार्टफोनमध्ये रियरवर ग्लास पॅनेल आहे व हे स्प्लॅश प्रूफ आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी८० प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ४ व ६ जीबी रॅम आणि स्टोरेजसाठी ६४ जीबी व १२८ जीबीचा पर्याय मिळेल. कूल २० चे डायमेंशन १६४.३x७५.६६x८.६५ मिलीमीटर आणि वजन १९९.६ ग्रॅम आहे. फोनमध्ये पॉवरसाठी ४५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कूलपॅड कूल २० मध्ये सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो १०८० पिक्सल व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकतो. फोनमध्ये रियरला ४८ मेगापिक्सल प्रायमरी आणि एक AI पोट्रेट कॅमेरा मिळेल. यात IS, टाइम-लॅप्स, स्लो-मोशन व्हिडियो शूटिंग, पॅनोरमा, प्रोफेशनल मोड सारखे फीचर्स मिळतील. हा फोन अँड्राइड ११ वर आधारित कूलओएसवर चालतो. यात ड्युअल ४G VoLTE, वाय-फाय ८०२.११एसी, ब्लूटूथ ५.०, जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि ३.५ एमएम ऑडिओ जॅक सारखे फीचर्स मिळतात. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oNTayG